‘भगवान श्रीकृष्णाची इच्छा असेल तर मी लोकसभा निवडणूक लढवणार’, कंगना रणौतनं राजकारणात येण्याचे दिले संकेत!

अभिनेत्री कंगना रणौतने शुक्रवारी गुजरातमधील द्वारका येथे राजकीय इनिंग सुरू करण्याचे संकेत दिले असून, भगवान श्रीकृष्ण प्रसन्न झाले तर ती पुढील लोकसभा निवडणूक लढवेल. असं ती म्हणाली.

  बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut ) नेहमी काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. नुकताच तिचा तेजस चित्रपट रिलीज झाला. पण या चित्रपटाला प्रेक्षकांनी पाठ फिरवली. मोठा गाजावाचा करुन प्रदर्शित करुनही तिचा चित्रपट फ्लॅाप झाला. आता तिच्या आगामी चित्रपट येण्यास काही अवधी आहे, अशातच आता कंगनाच्या नव्या वक्तव्याने पुन्हा सगळ्याचं लक्ष वेधलं आहे. (Kangana Ranaut) हिने निवडणूक (Lok Sabha elections) लढवणार असल्याचे संकते दिल्याने सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आणले आहे. जर भगवान श्रीकृष्ण प्रसन्न झाले तर ती पुढील लोकसभा निवडणूक लढवणारस, असं तीनं म्हण्ह

  काय म्हणाली कंगना?

  नुकतच, कंगनाने गुजरातमधील द्वारका येथे मंदिरात भेट दिली होती. यावेळी राजकीय इनिंग सुरू करण्याचे संकेत दिले होते आणि सांगितले होते की, जर भगवान श्रीकृष्ण प्रसन्न झाले तर ती पुढील लोकसभा निवडणूक लढवेल. तसेच, गेल्या काही दिवसापासून कंगना केंद्रातील भाजप सरकारचे आणि विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजप कंगनाला मंडी मतदारसंघातून उमेदवारी देऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

  कंगनाचं कुटुंब काँग्रेसशी जोडलेलं

  अभिनेत्री कंगना राणौतचे कुटुंब प्राचीन काळापासून काँग्रेस पक्षाशी जोडले गेले आहे. कंगनाचे आजोबा सरजू सिंग हे स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित होते. ते काँग्रेस पक्षाचे सक्रिय सदस्य होते. जेव्हा हिमाचल प्रदेशला प्रादेशिक परिषदेचा दर्जा होता, तेव्हा त्यांनी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि 1963 ते 1967 पर्यंत ते सदस्य होते.