निवडणूक जिंकली तर बॉलिवूड सोडेन! कंगना राणौतची मोठी घोषणा, म्हणाली मी फक्त राजकारण करणार…

कंगना राणौत हिमाचल प्रदेशातील मंडी येथून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहे. लोकसभा निवडणूक जिंकल्यास ती हळूहळू शोबिझचे जग सोडू शकते, असे संकेत कंगनाने दिले. कारण तिला फक्त एकाच कामावर लक्ष केंद्रित करायला आवडेल.

  बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत (Kangana Ranaut) यंदाच्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha 2024) भाजपची उमेदवार आहे. हिमाचल प्रदेशातील मंडीतून ती निवडणुकीच्या रिंगणात उभी आहे. सध्या कंगना जोरात प्रचार करतेय.  या निवडणुकीत आपला विजय होईल, असा तिनं विश्वास व्यक्त केलाय. निवडणूक जिंकली तर बॅालिवूडला कायमता रामराम करेन असं कंगना म्हणाली आहे.

  कंगना राजकारणासाठी बॉलिवूड सोडणार?

  लोकसभा निवडणूक जिंकल्यास ती हळूहळू बॅालिवूड सोडू शकते, असे संकेत कंगनाने दिले. कारण ती म्हणाली की तिला कुठल्याही एका कामावर लक्ष केंद्रित करायला आवडेल. कंगनाला विचारण्यात आले – ती चित्रपट आणि राजकारण कसे सांभाळेल? यावर अभिनेत्री म्हणाली, ‘मी चित्रपटात अभिनयही करते, भूमिकाही करते आणि दिग्दर्शनही करते. राजकारणात लोक माझ्यासोबत येण्याची शक्यता दिसली, तरच मी राजकारण करेन.
  “जर मला वाटत असेल की लोकांना माझी गरज आहे तर मी त्या दिशेने जाईन. मंडीतून जिंकले तरच राजकारण करेन. अनेक चित्रपट निर्माते मला राजकारणात जाऊ नका असे सांगतात. तुम्ही लोकांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात. माझ्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेमुळे लोक प्रवास करतात हे चांगले नाही. मी एक विशेषाधिकारयुक्त जीवन जगलो आहे, जर आता मला लोकांशी जोडण्याची संधी मिळाली तर मी ती देखील स्वीकारेन. मला वाटतं, लोकांच्या तुमच्याकडून ज्या अपेक्षा आहेत, त्याबद्दल तुम्ही आधी न्याय केला पाहिजे.

  कंगनाचं वर्क फ्रंट

  वर्क फ्रंटवर, कंगनाने क्वीन, थलैवी, तनु वेड्स मनू, फॅशन, मणिकर्णिका, गँगस्टर यांसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत. इमर्जन्सी हा तिचा आगामी चित्रपट असून त्यात तिने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट यावर्षी 14 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.