Javed's claim that he was offended by the false and baseless allegations; Kangana again in court against defamation suit

लेखक-दिग्दर्शक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी कंगना रनौतविरोधात (Kangana Ranaut) बदनामीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणाची १४ सप्टेंबरला अंधेरी न्यायालयात सुनावणी होणार होती. जावेद अख्तर पत्नी शबाना आजमीसह कोर्टात पोहोचले होते.मात्र कंगनाची तब्येत बरी नसल्याने ती हजर राहू शकली नाही.

    गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या प्रकरणाची(Defamation Case Hearing In Court) आज अंधेरी(Andheri) महानगर दंडाधिकारी कोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीला अभिनेत्री कंगना रनौतने (Kangana Ranaut To Attend Hearing) हजेरी लावली आहे. कारण गेल्या सुनावणीत कोर्टाने कंगनाला इशारा दिला की, २० सप्टेंबरच्या सुनावणीला जर ती उपस्थित राहिली नाही, तर तिच्या विरोधात अटक वॉरंट जारी होईल.

    कंगनाच्या वकिलांनी आधीच्या सुनावणी दरम्यान कोर्टात सांगितले होते की, कंगनाची तब्येत ठीक नाही, तिला कोरोनाची लक्षणे असल्याने तिला टेस्ट देखील करून घ्यायची होती. मात्र, आज कंगनाला कोर्टात हजर राहावे लागले. आता या प्रकरणाची पुढची सुनावणी १५ नोव्हेंबरला होणार आहे.

    लेखक-दिग्दर्शक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी कंगना रनौतविरोधात (Kangana Ranaut) बदनामीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणाची १४ सप्टेंबरला अंधेरी न्यायालयात सुनावणी होणार होती. जावेद अख्तर पत्नी शबाना आजमीसह कोर्टात पोहोचले होते.मात्र कंगनाची तब्येत बरी नसल्याने ती हजर राहू शकली नाही. कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी कंगनाच्या तब्येतीबाबतची माहिती कोर्टामध्ये दिली. कंगनाच्या वकिलांनी कोर्टात वैद्यकीय प्रमाणपत्रही सादर केले आहे आणि एक आठवड्याचा वेळही मागितला आहे.आता या प्रकरणी सुनावणी आज पार पडली. आता १५ नोव्हेंबरला पुढची सुनावणी होणार असल्याची माहिली मिळाली आहे.

    गेल्या वर्षी सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अभिनेत्रीने काही मुलाखतींमध्ये जावेद अख्तर यांच्या विरोधात काही वक्तव्ये केली. तेव्हा जावेद अख्तर यांनी कंगनाविरोधात हा खटला दाखल केला होता. यानंतर जावेद यांनी कंगनाच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला. त्यांनी अभिनेत्रीवर आपली प्रतिमा खराब करण्याचा आरोप केला. तेव्हापासून आजपर्यंत दोघांमधील हे प्रकरण चालू आहे.