कंगणा रणौतचा अॅक्शन चित्रपट ‘तेजस’ ओटीटीवर प्रदर्शित होणार, जाणून घ्या सविस्तर

एका व्हिडिओमध्ये कंगनाने म्हटले होते, "मित्रांनो, माझा तेजस चित्रपट उद्या थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. ज्यांनी हा चित्रपट पाहिला आहे ते प्रत्येकजण आम्हाला खूप कौतुक आणि आशीर्वाद देत आहेत.

  तेजस चित्रपट ओटीटीवर होणार प्रदर्शित : २०२३ हे वर्ष कंगना रणौतसाठी अशुभ होते. या वर्षी अभिनेत्रींचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. कंगनाला तिच्या शेवटच्या रिलीज झालेल्या ‘तेजस’ चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या पण हा चित्रपटही प्रेक्षकांना आवडला नाही आणि अभिनेत्रीच्या फ्लॉप चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाचा देखील समावेश झाला. २७ ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तेजस’ची ओटीटी रिलीज डेट आता जाहीर करण्यात आली आहे. कंगनाचा हा चित्रपट केव्हा आणि कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे ते येथे जाणून घेऊया.

  ‘ तेजस’ कधी आणि कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल ?
  एरियल अॅक्शन पॅक्ड थ्रिलर ‘तेजस’मध्ये कंगना रणौत भारतीय वायुसेनेच्या पायलटची भूमिका साकारत आहे. सर्वेश मेवाडा यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले असून रॉनी स्क्रूवाला यांनी निर्मिती केली आहे. आता ‘तेजस’ची ओटीटी रिलीज डेट आली आहे. हा चित्रपट ५ जानेवारीला OTT प्लॅटफॉर्म Zee5 वर प्रदर्शित होणार आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by RSVP (@rsvpmovies)

  एका व्हिडिओमध्ये कंगनाने म्हटले होते, “मित्रांनो, माझा तेजस चित्रपट उद्या थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. ज्यांनी हा चित्रपट पाहिला आहे ते प्रत्येकजण आम्हाला खूप कौतुक आणि आशीर्वाद देत आहेत. पण मित्रांनो, कोविड १९ नंतर आपली हिंदी चित्रपटसृष्टी पूर्णपणे सावरलेली नाही. 99% चित्रपटांना प्रेक्षकांनी संधी दिली नाही. मला माहीत आहे की, आजच्या युगात प्रत्येकाच्या घरी मोबाईल फोन आणि टीव्ही आहे. पण चित्रपटगृहांमध्ये सामुदायिक चित्रपट पाहणे हा सुरुवातीपासूनच आपल्या सभ्यतेचा महत्त्वाचा भाग आहे. नृत्य, कला… सर्व प्रकारची नृत्ये, लोकगीते… सर्व महत्त्वाचे आहेत. त्यामुळे हिंदी चित्रपट प्रेक्षकांना आणि विशेषत: मल्टिप्लेक्स प्रेक्षकांना माझी ही विनंती आहे… जर तुम्हाला उरी, मेरी कोम आणि नीरजा आवडली असेल तर तुम्हाला तेजसही आवडेल.”