कंगना राणौतकडे कोटयावधीची संपत्ती? ऐकून तुम्हाला सुद्धा बसेल धक्का

राजकारणात करत तिने 'भारतीय जनता पार्टी'मध्ये प्रवेश केला आणि तिची राजकीय कारकीर्द सुरू केली.

  बॉलिवूड अभिनेत्री कंगन राणौतने (Kangan Ranaut) सिनेमा क्षेत्रात आपले नाव मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. कंगनाने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2006 मध्ये ‘गँगस्टर’ या चित्रपटातून तिने सिनेमा क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तिने केल्या अनेक हिंदी चित्रपटातून तिला प्रसिद्धी मिळत गेली. तसेच तिने अनेक पुरस्कार देखील जिंकले. मात्र २०२४ मध्ये कंगनाने राजकारणात प्रवेश केला. राजकारणात करत तिने ‘भारतीय जनता पार्टी’मध्ये प्रवेश केला आणि तिची राजकीय कारकीर्द सुरू केली. आगामी लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये कंगनाला हिमाचल प्रदेशातील मंडी येथून निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.

  कंगना राणौतकडे असलेल्या सोन्याची किंमत:

  १४ मे २०२४ ला तिने हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात भाजप उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर सादर करण्यात आलेल्या अधिकृत प्रतिज्ञापत्रामध्ये कंगनाच्या मालकीची सर्व रक्कम नोंदवण्यास सांगण्यात आली. त्यानुसार कंगनाकडे स्वतःची ९१ कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यापैकी 28.7 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि 62.9 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याचे उघड झाले आहे.

  प्रतिज्ञापत्रात जाहीर केल्यानुसार, कंगनाकडे 6.7 किलो सोन्याचे दागिने आहेत. ज्याची किंमत ५ कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाय तिच्याकडे भांडी आणि दागिन्यांच्या रूपात 60 किलो चांदी आहे, याची किंमत ५० लाख रुपयांच्या आसपास असल्याचे जाहीर झाले आहे. एवढंच नसून कंगनाकडे ३ कोटी रुपयांचे हिऱ्याचे दागिने आहे.

  कंगना राणौतचा बँक बॅलेन्स:

  लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कंगनाने आपली संपत्ती जाहीर केली आहे. तिच्याकडे कोट्यवधी रुपयांचे सोनं असून इतर अनेक गोष्टी असल्याचे उघड झाले आहे. प्रतिज्ञापत्रात तिच्या कार कलेक्शनचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. त्यानुसार तिच्याकडे 98 लाख रुपयांची ‘BMW’ आणि 58 लाख रुपयांची ‘मर्सिडीज बेंझ’ आहे. तर ‘मर्सिडीज मेबॅक’ देखील आहे. या गाड्यांची किंमत सुमारे 3.91 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच तिचा बँक बॅलन्स १.३५ कोटी रुपये आणि २ लाख रुपये रोख आहे. कंगनावर १७ कोटी रुपयांचे कर्ज देखील आहे.

  कंगना राणौतचे गुन्हेगारी खटले:

  मुंबईमध्ये कंगना राणौतकडे 16 कोटी रुपयांचे तीन फ्लॅट्स आहेत तर मनालीमध्ये तिचे कुटुंब 15 कोटी रुपयांचे आहे. तसेच तिच्या नावावर एलआयसीच्या 50 पॉलिसी असून तिच्यावर ८ फौजदारी खटले प्रलंबित आहेत.