puneet rajkumar

कन्नड सुपरस्टार अभिनेते पुनीत राजकुमार(Puneet Rajkumar Passed Away) यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या ४६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

  कन्नड चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अभिनेते पुनीत राजकुमार(Puneet Rajkumar Passed Away) यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या ४६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे कन्नड चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

  पुनीत यांना आज दुपारी १ ते १.३० च्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यानंतर त्यांना तातडीने बंगळुरुतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरु होते. रुग्णालयातील डॉक्टरांचे एक पथक त्याच्यावर सतत नजर ठेवून होते. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती खालवत गेली. बंगळुरुमधील विक्रम रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.

  पुनित राजकुमार यांच्या निधनाने संपूर्ण कर्नाटकवर शोककळा पसरली आहे. राज्यातील सर्व थिएटर्स बंद करण्यात आले आहेत. पुनित राजकुमार यांच्या चाहत्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्यत १४४ कलम लागू करण्यात आले आहे. निधनाचे वृत्त कळताच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हॉस्पिटलमध्ये पोहचले.

  पुनीतचे वडील राजकुमार दाक्षिणात्य सिनेमाचे आदर्श म्हणून ओळखले जात. कन्नड फिल्म इंडस्ट्रीचे ते पहिले कलाकार होते, ज्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले होते. चंदन तस्कर वीरप्पन याने २००० साली तामिळनाडूतून राजकुमार यांचे अपहरण केले होते. पुनित यांनी त्यांच्या अभिनयातील करिअरची सुरुवात बाल कलाकार म्हणून केली होती. त्यांना राषअट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्य़ाच आले होते.

  सेलिब्रिटींनी वाहिली श्रद्धांजली
  सिने दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी पुनीत यांच्या निधनाबद्दल दुख व्यक्त केले आहे. पुनीत राजकुमार यांचा दुर्दैवी मृत्यू वेदनादायी आहे. हे एक डोळे उघडणारे आणि भयानक सत्य आहे, की आपल्यातील कुणीही कधीही मरु शकतो, त्यामुळे फास्ट फॉरवर्ड मोडवर जगणे कधीही चांगले आहे.

  हिंदीतील अभिनेता आर माधवन यानेही पुनीत यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. सर्वाधिक प्रिय आणि चांगल्या व्यक्तिंमध्ये असलेल्या पुनीत यांच्या जाण्याने व्यथित असल्याचे त्याने लिहिले आहे. आमच्या सगळ्यांची ह्रदयं तोडून पुनीत गेल्याचे त्याने लिहिले आहे.

  पुनीत राजकुमार यांनी बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. १९८५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बेट्टाडा हूवू’ चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला आहे. तसेच ‘चालिसुवा मोडागलू’ आणि ‘येराडू नक्षत्रगलू’ या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना कर्नाटक राज्याचा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला आहे.

  पुनीत हे २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या अप्पू या चित्रपटामुळे ते प्रसिद्धीझोतात आले. त्याने आतापर्यंत कन्नडमधील अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभि, वीरा कन्नडिगा, अजय, अरासू, राम, हुदुगारू आणि अंजनी पुत्र या चित्रपटात काम केले आहे.