‘कन्नी’ चित्रपटाच्या टिमने सिद्धिविनायक मंदिराला दिली भेट, चित्रपटाच्या यशस्वितेसाठी घेतलं बाप्पाचं दर्शन!

    मैत्री, प्रेम आणि स्वप्नं यांना एकत्र जोडणारा ‘कन्नी’ चित्रपट (Kanni) आज (८ मार्च) रोजी प्रदर्शित होत आहे. यानिमित्ताने बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी ‘कन्नी’ चित्रपटाच्या टीमने प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली. यावेळी अभिनेत्री हृता दुर्गुळे(Hruta Durgule), अभिनेता शुभंकर तावडे (Shubhankar Tawade) यांच्यासह चित्रपटाची टिम उपस्थित होती.

    मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन्स एंटरटेनमेंट्स आणि बियाँड इमॅजिनेशन फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन समीर जोशी यांचे असून अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर, सनी राजानी ‘कन्नी’चे निर्माते आहेत. दिग्दर्शक समीर जोशी म्हणतात, ” पतंग आणि मांजाला जोडून ठेवण्याचे काम ज्याप्रमाणे ‘कन्नी’ करते तसेच आपल्या आयुष्यातही मैत्री, प्रेम आणि स्वप्नं यांना जोडून ठेवणारी एक ‘कन्नी’ असणे खूप महत्वाचे आहे. आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर याचे महत्व आपल्याला कळते. या चित्रपटातून हेच दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. हा एक कौटुंबिक चित्रपट आहे, जो तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत, मित्रमैत्रिणींसोबत आवर्जून पाहावा.

    हसू आणि आसूने भरलेल्या ‘कन्नी’चा प्री ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.  तसेच चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या पंसतीस उतरली आहेतच. आता  मैत्री, प्रेम आणि स्वप्न यांना जोडून ठेवणारा हा चित्रपट शुक्रवारी रिलीज झाला आहे.