kantara tulu version

‘कांतारा’ने (Kantara News) जगभर आपला ठसा उमटवला असून, हा चित्रपट आता भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील आपले वर्चस्व गाजवताना दिसत आहे. अशातच, ‘कांतारा’ आता ऑस्ट्रेलियात आपले तुलू व्हर्जन प्रीमियर करण्यासाठी सज्ज झाला आहे.

    होंबाळे फिल्म्सचा सुपरहिट चित्रपट ‘कांतारा’(Kantara) प्रदर्शित झाल्यापासून जगभरात धुमाकूळ घालत आहे. याने आधुनिक काळात चित्रपटाच्या यशाची पातळी खऱ्या अर्थाने पुन्हा परिभाषित केली आहे. तसेच, प्रेक्षकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असतानाच, आता ‘कांतारा’ हा चित्रपट ऑस्ट्रेलियामध्ये (Kantara Tulu Version Premier) आपले तुलू व्हर्जन प्रीमियर करण्यासाठी सज्ज झाला आहे.

    ‘कांतारा’ने (Kantara News) जगभर आपला ठसा उमटवला असून, हा चित्रपट आता भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील आपले वर्चस्व गाजवताना दिसत आहे. अशातच, ‘कांतारा’ आता ऑस्ट्रेलियात आपले तुलू व्हर्जन प्रीमियर करण्यासाठी सज्ज झाला असून हा चित्रपट भारतीय संस्कृती एका नवीन ठिकाणी प्रदर्शित करेल.

    ड्रीम स्क्रीन इंटरनॅशनल, भारतीय चित्रपट डिस्ट्रीब्यूटर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांनी त्यांच्या प्रदेशात चित्रपटाचे वितरण केल्याचा आनंद व्यक्त करत सोशल मीडियावर शोचे वेळापत्रक शेअर केले आणि लिहिले, ‘कांतारा’ तुलू व्हर्जनची घोषणा करताना खूप आनंद होत आहे… ब्लॉकबस्टर हिट झाल्यानंतर ‘कांतारा’चे ओरिजनल तुलू व्हर्जन मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी सर्वजण प्रतीक्षा करत होते थिएटरमध्ये #DivineBlockbusterKantara तुलू व्हर्जन.”

    ‘कांतारा’चे कन्नड व्हर्जन आणि हिंदी व्हर्जन ३० सप्टेंबर आणि १४ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाले. तसेच, या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन ऋषभ शेट्टी यांनी केले असून होंबाळे फिल्म्स अंतर्गत विजय किरागंदूर आणि चालुवे गौडा निर्मित, या चित्रपटात ऋषभ शेट्टी, सप्तमी गौडा आणि किशोर कुमार मुख्य भूमिकेत आहेत.