kapil sharma

  दिवाळीच्या दोन दिवसांनी कॅामेडियन कपिल शर्माने (kapil sharma) चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. आपल्या कॉमेडीने देशातील प्रेक्षकांमध्ये आपली ओळख निर्माण करणारा कपिल शर्मा सध्या त्याच्या आगामी कॉमेडी शोमुळे चर्चेत आहे. ‘द कपिल शर्मा शो’ द्वारे लोकांचं मनोरंजन करण्यासाठी आता पुन्हा सज्ज झाला आहे. आता कपिलने त्याच्या पुढच्या शोची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे हा शो आता टीव्हीवर नाही तर ओटीटीवर प्रसारित होणार आहे.

  कपिलने नवीन कॉमेडी शोची केली घोषणा

  ‘द कपिल शर्मा शो’चा चौथा सीझन यावर्षी जुलैमध्ये संपला. यानंतर प्रेक्षक कॉमेडियनच्या शोच्या पुढच्या सीझनची आतुरतेने वाट पाहत होते. आता कपिलने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून त्याच्या नवीन शोची घोषणा केली आहे. कपिलने शोचा प्रोमो चाहत्यांसोबत शेअर केला आहे, मात्र शीर्षक नसलेल्या शोमध्ये कपिल त्याच्या ‘द कपिल शर्मा शो’ या हिट शोमधील अनेक सहकाऱ्यांसोबत दिसणार आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Netflix India (@netflix_in)

  नव्या प्रोमोमध्ये काय खास?

  शोच्या नवीन प्रोमोमध्ये कॉमेडियनने आपल्या चित्रपटांना सूचना दिल्या आहेत. मॅनेजर त्याच्या नवीन घराची सजावट करताना दाखवले आहे. तो तेथे त्याच्या जुन्या टीम सदस्यांना शोधताना दिसत आहे, ज्यात अर्चना पूरण सिंग ते किकू शारदा आणि कृष्णा अभिषेक यांचा समावेश आहे. प्रोमो संपताच, मॅनेजर विचारतो की त्यांना या लोकांना बाहेर टाकायचे आहे का. यावर कपिल हसतो आणि म्हणतो, ‘घर बदलले आहे, कुटुंब नाही.’

  कपिल शर्माच्या या प्रोमोला चाहत्यांकडून भरभरून दाद मिळत आहे . एका यूजरने कमेंट करत म्हटले की, ‘पुन्हा एकदा कपिलला पडद्यावर पाहणे खूप मजा येईल.’ दुसर्‍या युजरने लिहिले की,  आता शो पाहण्यासाठी पैसे मोजावे लागतील. आणखी एका युजरने म्हटले की, ‘आता या नव्या शोमध्ये कपिल कोणता नवा धमाका करणार आहे ते पाहावे लागेल.’