‘Zwigato’मध्ये कपिल शर्मा दिसणार वेगळ्या अंदाजात, पहा चित्रपटाचा फर्स्ट लूक व्हिडिओ 

कॉमेडियन कपिल शर्मा त्याच्या आगामी 'Zwigato' या चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. नंदिता दास यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. कपिलशिवाय या चित्रपटात अभिनेत्री शहाना गोस्वामी देखील दिसणार आहे. अशा परिस्थितीत टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या ट्विटर हँडलवर 'Zwigato'चा फर्स्ट लूक व्हिडिओ रिलीज करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये कपिल आणि शहाना पती-पत्नीच्या भूमिकेत दिसत आहेत.