यश जोहर फाऊंडेशनची स्थापना, करण जोहरने फादर्स डे च्या निमित्ताने शेअर केली पोस्ट

यश जोहर फाऊंडेशनबद्दल त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून माहिती देताना करण जोहरने लिहिले की, माझ्या अविश्वसनीय वडिलांच्या स्मृतीत आणि त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी याची गरज होती.

    दिग्दर्शक, निर्माता करण जोहरने आपल्यांच्या नावाने यश जोहर फाउंडेशनची सुरूवात केली आहे. फादर्स डे च्या दिवशी करणने सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करत याविषयी माहिती दिली. या फाउंडेशनद्वारे करण मनोरंजन क्षेत्रातील गरजू आणि त्याच्या कुटुंबियांची मदत करू शकेल.

    यश जोहर फाऊंडेशनबद्दल त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून माहिती देताना करण जोहरने लिहिले की, माझ्या अविश्वसनीय वडिलांच्या स्मृतीत आणि त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी याची गरज होती. भारतीय मनोरंजन उद्योगातील लोकांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने स्थापन झालेली यश जोहर फाउंडेशन सुरू केल्याचा मला अभिमान आहे. आम्ही मनोरंजन उद्योगातील लोक आणि त्यांचे कुटुंब यांचे जीवन वाढवणार्‍या दीर्घकालीन टिकाऊ योजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे, परंतु आम्ही हे देखील सुनिश्चित केले आहे की सध्या चालू असलेल्या जागतिक साथीच्या परिणामाचा सामना करण्यासाठी त्वरित उपाययोजना प्रदान करण्यात येतील.