karan johar

सौरभ महाकालने पोलिसांना सांगितलं की, चित्रपट दिग्दर्शक, निर्माता करण जोहर (Karan Johar) बिष्णोई गँगच्या निशाण्यावर (Bishnoi Gang Target) होता. पोलीस या प्रकरणातील सत्याची पडताळणी करत आहेत.

    सिद्धू मुसेवालाच्या हत्या (Sidhu Moosewala) प्रकरणातील आरोपी सौरभ महाकालने (Saurabh Mahakal) धक्कादायक खुलासा केला आहे. सौरभ महाकालने पोलिसांना सांगितलं की, चित्रपट दिग्दर्शक, निर्माता करण जोहर (Karan Johar) बिष्णोई गँगच्या निशाण्यावर (Bishnoi Gang Target) होता. पोलीस या प्रकरणातील सत्याची पडताळणी करत आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं की, “करण जोहरकडून पाच कोटी वसूल करण्याची योजना होती असा महाकालचा दावा आहे. पण तो पोलिसांची दिशाभूल करत असल्याचीही शक्यता आहे”.

    याआधी महाकालने अभिनेता सलमान खानला देण्यात आलेल्या धमकीमागे लॉरेन्स बिष्णोई गँग असल्याचं सांगितलं होतं. त्याने दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानामधील तिघेजण पालघरमधील एका फॅक्टरीत काम करतात. मुंबईत धमकीचं पत्र देण्यासाठी तेच गेले होते. जेव्हा पोलीस पालघरमधील फॅक्टरीत पोहोचले तेव्हा हे तिघे तिथे काम करत नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

    यानंतर पोलिसांना महाकालने धमकीच्या पत्रामागे असणाऱ्या ज्या तिघांचा उल्लेख केला होता त्यांना ५ जूनला राजस्थानमध्ये दरोड्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली असल्याची माहिती मिळाली होती. ते अद्याप जेलमध्येच आहेत. यामुळेच पोलिसांनी आपण महाकालने दिलेल्या माहितीवर पूर्पणणे विश्वास ठेवत नसल्याचं म्हटलं आहे.

    सौरभ महाकालला पुणे क्राइम ब्रांचने गेल्याच आठवड्यात बेड्या ठोकल्या आहेत. सलमान खान धमकी प्रकरणात मुंबई क्राइम ब्रांचने त्याची चौकशी केली आहे. महाकाल सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणातील आरोपींपैकी एक आहे.