
रोहित शेट्टीचा ‘सिंघम अगेन’ हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) ‘सिंघम अगेन’मधल्या अनेक गोष्टी समोर येत आहेत. (Singham Again) एकापाठोपाठ एका सुपरस्टारसोबत अभिनेत्रींची एन्ट्री होत आहे. रोहित शेट्टीने चाहत्यांना एक मोठे सरप्राईज दिले आहे. दीपिका पदुकोणच्या लेडी सिंघम लूकनंतर आता निर्मात्यांनी करीना कपूरचा फर्स्ट लूकही रिलीज केला आहे. रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समध्ये करिनाची पुन्हा एन्ट्री झाली आहे.
View this post on Instagram
रोहित शेट्टीच्या या चित्रपटात करीना कपूर (Kareena Kapoor) देखील दिसणार असल्याचे कन्फर्म झाले आहे. ‘सिंघम अगेन’ मधील करीना कपूरचं फर्स्ट लूक पोस्टर आणि चित्रपटातील पात्राचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. रोहित शेट्टी, अक्षय कुमार आणि अजय देवगणने ‘सिंघम अगेन’ मधील करिनाचा लूक शेअर केला आहे. चित्रपटात करिना अवनी बाजीराव सिंघमची भूमिका निभावणार आहे.
अजय देवगणने ‘सिंघम अगेन’ मधील करीना कपूर खानचा फर्स्ट लूक शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “क्रूर, मजबूत आणि सिंघमची ताकद! अवनी सिंघमला भेटा.” तर अक्षय कुमारने करीना फर्स्ट लूक शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “हिंमत असेल तरच अवनीशी पंगा घ्या.”
Avni Bajirao Singham returns…mess at your own risk!#SinghamAgain #KareenaKapoorKhan pic.twitter.com/lrYZSbdQcQ
— Akshay Kumar (@akshaykumar) November 8, 2023
फर्स्ट लूक पोस्टरच्या फोटोमध्ये दिसत आहे की, करीना कपूरच्या चेहऱ्यावर जखमा आहेत. तरीही ती हातामध्ये बंदूक घेऊन उभी आहे. अजय देवगण, दीपिका पदुकोण, अक्षय कुमार आणि रणवीर सिंग यांचा ‘सिंघम अगेन’ हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. गेल्या महिन्यात या स्टार्सने दिग्दर्शक रोहित शेट्टीसोबत चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली होती. आता या चित्रपटातील करीनाच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधू घेतले आहे. काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमारचा फर्स्ट लूक समोर आला होता. रोहित शेट्टीचा हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.