कार्तिकी गायकवाड आणि आदर्श शिंदे पहिल्यांदाच आले एकत्र ‘सपान लागलं’ साठी!

सर्वस्व एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘सपान लागलं’ ह्या मराठी अल्बम साँग चे पोस्टर (poster) नुकतेच आळंदी (Aalandi) येथे कार्तिकी गायकवाड यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. सर्वस्व एंटरटेन्मेन्ट च्या बॅनरखाली ‘सपान लागलं’ हा म्युझिक व्हिडिओ बाजारात येत असून यात ‘डॉक्टर डॉक्टर’ फेम ओंकार परदेशी रोमँटिक अवतारात दिसणार आहे

  मुंबई : लहानपणापासूनच संगीतक्षेत्रात प्रसिद्ध असलेली गायिका म्हणजे कार्तिकी गायकवाड (Kartiki Gaikwad). २००८ साली तिने सा रे ग म प लिटिल चॅम्प्स चे विजेतेपद पटकावले आणि तिच्या व्यावसायिक पार्श्वगायनाची सुरुवात झाली. शास्त्रीय संगीताचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेली कार्तिकी हे मराठी संगीतक्षेत्रातील मोठे नाव आहे आणि हे नाव तिने लहान वयातच कमावले आहे, सध्या ती सा रे ग म प लिटिल चॅम्प्स च्या जजच्या भूमिकेत दिसतेय. आता कार्तिकी गायकवाड पहिल्यांदाच म्युझिक अल्बम (Marathi Album) साठी गाणं गातेय. ‘सपान लागलं’ (Sapan Lagala) असं त्या गाण्याचं शीर्षक असून यात ती पहिल्यांदाच आदर्श शिंदे सोबत गाणं गाताना (Sing a song with Adarsh Shinde) दिसणारेय.

  सर्वस्व एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘सपान लागलं’ ह्या मराठी अल्बम साँग चे पोस्टर (poster) नुकतेच आळंदी (Aalandi) येथे कार्तिकी गायकवाड यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. सर्वस्व एंटरटेन्मेन्ट च्या बॅनरखाली ‘सपान लागलं’ हा म्युझिक व्हिडिओ बाजारात येत असून यात ‘डॉक्टर डॉक्टर’ फेम ओंकार परदेशी रोमँटिक अवतारात दिसणार आहे नवोदित तारका रुची कदम सोबत. रुची कदम ही सोशल मीडिया स्टार असून या व्हिडिओत ज्ञानेश्वरी गायकवाड सुद्धा झळकणार आहे.

  सुप्रसिद्ध गायिका कार्तिकी गायकवाड आणि आदर्श शिंदे यांनी पहिल्यांदाच माईक शेयर केलाय ‘सपान लागलं’ साठी. अभिनेता आणि गीतकार ओंकार परदेशी यानेसुद्धा गाण्यात भाग घेतला असून याचे संगीत दिलंय संगीतकार अनिल काकडे यांनी. सिद्धेश सानप यांनी या म्युझिक व्हिडिओचे दिग्दर्शन केलेय.

  ‘डॉक्टर डॉक्टर’ मधील अभिनेता ओंकार परदेशी बनला गीतकार!

  मनोरंजनसृष्टीत बरेच कलाकार मल्टी टॅलेंटेड असतात. अभिनयाव्यतिरिक्त पेंटिंग, स्पोर्ट्स, हस्तकला, शिल्पकला, लिखाण ई मध्येही पारंगत असतात. आता अभिनेता ओंकार परदेशीचेच उदाहरण घ्या ना. ‘डॉक्टर डॉक्टर’ या चित्रपटात ओंकार ने पार्थ भालेरावच्या मित्राच्या भूमिकेत धमाल उडवून दिली होती. याच ओंकारकडे कवितेचे अंग सुद्धा आहे आणि त्याने एका गाण्याचे बोल लिहिले आहेत. ‘सपान लागलं’ असं त्या गाण्याचं शीर्षक असून या म्युझिक व्हिडिओत तो मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

  सर्वस्व एंटरटेन्मेन्ट च्या बॅनरखाली ‘सपान लागलं’ हा म्युझिक व्हिडिओ बाजारात येत असून यात ‘डॉक्टर डॉक्टर’ फेम ओंकार परदेशी रोमँटिक अवतारात दिसणार असून त्याची नवोदित तारका रुची कदम सोबत रोमँटिक जोडी जमली आहे. रुची कदम सोशल मीडिया स्टार असून या व्हिडिओत ज्ञानेश्वरी गायकवाड सुद्धा झळकणार आहे. हे गाणे गायलेय सुप्रसिद्ध गायिका कार्तिकी गायकवाड आणि आदर्श शिंदे यांनी. ओंकार परदेशी यानेसुद्धा गाण्यात भाग घेतला असून याचे संगीत दिलंय संगीतकार अनिल काकडे यांनी. सिद्धेश सानप यांनी या म्युझिक व्हिडीओच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळलीय.

  ओंकार परदेशी चे शब्द, आवाज आणि अभिनय असलेला म्युझिक व्हिडीओ ‘सपान लागलं’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  सोशल मीडिया स्टार रुची कदम झळकणार ‘सपान लागलं’ मध्ये!

  सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात अनेक नवीन प्लॅटफॉर्म्स सुरु झाले तर काही बंद झाले. भारतीय गव्हर्नमेन्ट ने ‘बॅन’ करण्याआधी गेल्यावर्षीपर्यंत ‘टिक टॉक’ हा प्लॅटफॉर्म तरुणाईमध्ये प्रचंड प्रसिद्ध होता. देशाच्या कानाकोपऱ्यातील अनेक तरुण तरुणी आपल्यातील कलागुणांसकट येथे व्यक्त होत होते. या प्लॅटफॉर्मची महती एव्हडी वाढली की या प्लॅटफॉर्मवरसुद्धा ‘स्टार्स’ बनू लागले ज्यांना ‘टिक टॉक स्टार्स’ ही ‘पदवी’ मिळाली. यातील अनेक जण म्युझिक व्हिडीओजमध्ये दिसू लागले तर कांहींनीं तर चित्रपटसृष्टीत पाय ठेवला. अशीच एक मराठमोळी टिक टॉक स्टार आहे रुची कदम जी मनोरंजनसृष्टीत पदार्पण करण्यास तयार झालीय.

  रुची कदम चे टिक टॉक वर दशलक्षापेक्षा अधिक फॉलोअर्स होते आणि आता ती दुसऱ्या भारतीय ‘शॉर्ट व्हिडीओ’ प्लॅटफॉर्मवर तितकीच प्रसिद्ध आहे आणि तिच्या छोट्या छोट्या व्हिडीओ पोस्ट्सना खूपच पाठिंबा मिळत असतो. तर ही मराठमोळी रुची कदम आता झळकणार आहे एक म्युझिक व्हिडीओमध्ये. सर्वस्व एंटरटेन्मेन्ट च्या बॅनरखाली ‘सपान लागलं’ हा म्युझिक व्हिडीओ बाजारात येत असून यात रुचीची ‘डॉक्टर डॉक्टर’ फेम ओंकार परदेशी सोबत रोमँटिक जोडी बनली आहे. या गाण्यात ज्ञानेश्वरी गायकवाड सुद्धा झळकणार आहे. हे गाणे गायलेय सुप्रसिद्ध गायिका कार्तिकी गायकवाड हिने. तिला गाण्यात साथ दिली आहे आदर्श शिंदे व ओंकार परदेशी यांनी आणि संगीतदिग्दर्शन अनिल काकडे नी दिलंय.

  सोशल मीडिया स्टार रुची कदम चा पदार्पणीय म्युझिक व्हिडिओ ‘सपान लागलं’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.