kartik aaryan

आज सुपरस्टार कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan Birthday) वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त कार्तिक आर्यनने सिद्धीविनायकाचं दर्शन (Kartik Aaryan At Siddhivinayak Temple) घेत आशिर्वाद घेतला.

    भारतीय स्टार कार्तिक आर्यनसाठी (Kartik Aaryan) २०२२ हे वर्ष खूप यशस्वी ठरलं आहे. त्याच्या ‘भूल भुलैया २’या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटांनी चांगली कमाई केली. एकेकाळी इंडस्ट्रीबाहेरचा असलेला हा सुपरस्टार आज बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या आणि लोकप्रिय नावांपैकी एक बनला आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

    वाढदिवसापूर्वी कार्तिक आर्यनने आयएफएफआय (IFFI) २०२२ च्या उद्घाटनात आपल्या बहारदार परफॉर्मन्सने उपस्थितांची मने जिंकली. आज सुपरस्टार कार्तिक आर्यनचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त कार्तिक आर्यनने सिद्धीविनायकाचं दर्शन घेत बाप्पाचा आशिर्वाद घेतला.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

    कार्तिक आर्यनच्या आगामी चित्रपटाबद्दल सांगायचं तर ‘धमाका’नंतर, कार्तिक आर्यनचा आगामी  चित्रपट ‘फ्रेडी’ ओटीटीवर (OTT) प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. त्यानंतर, कार्तिक आर्यन क्रिती सॅननसोबत अ‍ॅक्शन-एंटरटेनर ‘शेहजादा’ मध्ये दिसणार असून, हा चित्रपट फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच, ‘कॅप्टन इंडिया’, ‘सत्यप्रेम की कथा’ आणि ‘आशिकी ३’ या चित्रपटांमध्येही तो झळकणार आहे.