Video हळदीपासून रिसेप्शनपर्यंत… असा रंगला कार्तिकीचा लग्नसोहळा; बघा खास व्हिडीओ

लग्नबंधनात अडकली. लग्नाला काही दिवस उलटले असले तरी त्यांच्या लग्नाच्या चर्चा अद्याप सुरू आहेत. लॉकडाउनच्या काळातही कार्तिकी व रोनितचं लग्न अगदी थाटामाटात पार पडलं. यात सध्या कार्तिकी व रोनितच्या लग्नातील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये लग्नसोहळ्यातील मोजके पण महत्त्वाचे क्षण दाखवण्यात आले आहेत.

सध्या सोशल मीडियावर कार्तिकी आणि रोनितच्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील जिंदगी का सफर.. अब तेरे साथ में हे गाणं कार्तिकीने स्वत: गायलं असून तिच्या भावाने कौस्तुभ गायकवाडने तिला साथ दिली आहे. या व्हिडीओमध्ये हळदी समारंभापासून ते अंतरपाट आणि सप्तपदींपर्यंत सगळे विधी सुंदररित्या दाखवण्यात आले आहेत.

कार्तिकी ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय गायिका आहे तर तिचा पती रोनित पिसे हा पुण्याचा राहणारा असून इंजिनिअर आहे. २६ जुलै २०२० रोजी या दोघांचा साखरपुडा झाला त्यानंतर मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत या दोघांनी लग्नगाठ बांधली.

कार्तिकीच्या लग्नाचा हा व्हिडिओ चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. आत्तापर्यंत या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओबरोबरच त्यातील गाणं प्रेक्षकांना जास्त आवडलं आहे. हे गाणं कौस्तुभने स्वत:च संगीतबद्धदेखील केलय.