कतरिना कैफचे इन्स्टाग्राम अकाऊंट झाले हॅक? हे धक्कादायक नाव दिसले प्रोफाईलमध्ये

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफच्या इन्स्टाग्राम अकाउंटचे नाव बदलण्यात आले आहे. अचानक तिच्या अकाऊंटचे नाव बदलल्यानंतर तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाल्याचा अंदाज तिच्या चाहत्यांनी लावला. तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटचे नाव Camedia Moderatez असे ठेवले आहे.

  अलीकडेच, बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफच्या इन्स्टाग्राम अकाउंटचे नाव बदलण्यात आले आहे. अचानक तिच्या अकाऊंटचे नाव बदलल्यानंतर तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाल्याचा अंदाज तिच्या चाहत्यांनी लावला. लोकांनी पटकन अभिनेत्रीच्या खात्याच्या नवीन नावाचा स्क्रीनशॉट घेतला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यास सुरुवात केली. कतरिना कैफने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती प्रिंटेड आउटफिटमध्ये दिसत आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

  तिने तिच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘Dreamy Florals coming soon with गौरी खान!’ अभिनेत्री लवकरच शाहरुख खानची पत्नी गौरी खानसोबत एक ड्रीम प्रोजेक्ट करणार आहे. यामुळे अभिनेत्रीने स्वतः तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटचे नाव बदलले आहे. तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटचे नाव Camedia Moderatez असे ठेवले आहे. मात्र, हॅकिंगची चर्चा तीव्र होत असल्याचे पाहून कतरिना कैफने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटचे नाव बदलून जुने नाव ठेवले. अभिनेत्रीचे इंस्टाग्रामवर खूप चाहते आहेत. तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर 66.1 मिलियन फॅन फॉलोअर्स आहेत.

  कतरिना कैफच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ही अभिनेत्री लवकरच ‘फोन भूत’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट ४ नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.