ravindra kolhe, smita kolhe

सोनी टीव्हीचा प्रसिद्ध शो कौन बनेगा करोडपती १२ चा कालचा भाग खूप विशेष ठरला. या कर्मवीर स्पेशल भागात नेहमीप्रमाणेच स्पेशल गेस्ट हॉटसीटवर बसले. या कर्मवीर स्पेशल एपिसोडमध्ये पद्मश्री डॉ.रविद्र कोल्हे आणि पद्मश्री डॉ.स्मिता कोल्हे सहभागी झाले होते. डॉ. रविंद्र कोल्हे आणि स्मिता कोल्हे यांचे काम बघून महानायक अमिताभ बच्चन यांनी सलाम केला.

या कोल्हे दाम्पत्याचा खेळ बघून बिग बींना देखील आश्चर्य वाटले. एका मागून एक प्रश्नांची उत्तरं हे दोघं देत होते. त्यांच्या यावयातील खेळ बघून सगळेच अवाक झाले. या दाम्पत्याने एका प्रश्नाचं उत्तर बरोबर देत २५ लाख रूपये आपल्या नावावर केले. वेळ संपल्यामुळे तो एपिसोड तिथेच थांबवण्यात आला.

तुम्हीला माहितेय २५ लाखांसाठी विचारलेला प्रश्न काय होता ते?

१. यामधील कोणता समाजसुधारकाने १९४२मध्ये भारत छोडो आंदोलनाच्या दरम्यान अटक करण्यात आलेल्या लोकांसाठी वकिलाची भुमिका बजावली?

  1. धोंडो केशव कर्वे
  2. बाबा आमटे
  3. विनोबा भावे
  4. नाना जी देशमुख

उत्तर – B. बाबा आमटे

या कार्यक्रमा दरम्यान अनेक पर्सनल गोष्टींवरही चर्चा झाली. या दरम्यान रविंद्र कोल्हे यांनी सांगितलं की, त्यांनी जिंकलेली रक्कम सामाजिक कार्यासाठी वापरण्यात येईल. गरीब मुलांसाठी एक कॅम्पेन चालवण्यात येणार आहे. त्याचबरोबर गरजवंताच्या औषधोपचारांसाठी देखील या रकमेतील काही रक्कम वापरण्यात येणार आहे. त्यांचे हे कार्य ऐकून अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या कामाचं कौतुक केलं.