ketaki chitale paints trishul

केतकी चितळेला अटक करताना तिच्यावर शाईफेक करण्यात आली. या शाईफेकीच्या घटनेनंतर तिच्या ब्लाऊजवर (Ketaki Chitale Paints Trishul On Her Blouse) शाईचे डाग पडले होते. आता याच ब्लाऊजवर तिने एक चित्र काढले आहे.

    अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) शरद पवारांविषयी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. या प्रकरणी केतकीला तुरुंगवासही भोगावा लागला. अटकेदरम्यान तिच्यावर शाईफेक करण्यात आली. या शाईफेकीच्या घटनेनंतर तिच्या ब्लाऊजवर (Ketaki Chitale Paints Trishul On Her Blouse) शाईचे डाग पडले होते. आता याच ब्लाऊजवर तिने एक चित्र काढले आहे.

    केतकीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती ब्लाऊज रंगवताना दिसत आहे. व्हिडिओत शाईफेक करण्यात आली त्यावेळचे फोटो आहेत आणि त्यानंतर शाईमुळे खराब झालेला ब्लाऊज ती दाखवताना दिसत आहे. केतकीने शाई उडालेल्या ब्लाउजच्या भागावर रंग भरून त्रिशूळ काढले आहे.

    व्हिडीशो शेअर करत “हर हर महादेव” असे तिने लिहिले आहे. केतकीच्या या कलेचे सगळ्यांकडून कौतुक होत आहे.