KGF स्टार यशनं मृतांच्या कुटुंबीयांची घेतली भेट, काल 3 चाहत्यांना विजेचा धक्का लागून झाला मृत्यू!

दक्षिणेतील अभिनेता यशच्या वाढदिवसानिमित्त लक्ष्मेश्वर तालुक्यातील सुरंगी गावात भीषण अपघात झाला. यशच्या फोटोचे कटआउट लावताना तीन जण भाजले आणि त्यांचा मृत्यू झाला.

  दाक्षिणात्य अभिनेता आणि KGF स्टार यशचा (Yash) 8 जानेवारीला वाढदिवस होता. तथापि, त्याचा करताना त्याच्या तीन चाहत्यांना त्रास झाला आणि त्यांचा मृत्यू झाला. यशला याची माहिती मिळताच तो या चाहत्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी हुबळीला पोहोचला. कर्नाटकातील गदग जिल्ह्यातील सुरंगी गावात हा अपघात झाला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तिघे तरुण यशचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बॅनर लावत असताना अचानक त्यांना विजेचा धक्का बसून त्यांचा मृत्यू झाला. याबद्दल कळताच यशने हुबळी गाठून मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

  यशच्या वाढदिवसाला घडली दुर्घटना

  दक्षिणेतील अभिनेता यशच्या वाढदिवसानिमित्त लक्ष्मेश्वर तालुक्यातील सुरंगी गावात भीषण अपघात झाला. यशच्या फोटोचे कटआउट लावताना तीन जण भाजले आणि त्यांचा मृत्यू झाला. हणमंत हरिजन (21), मुरली नदविनमणी (20), नवीन गाझी (19) अशी मृतांची नावे आहेत. अन्य तिघे गंभीर जखमी झाले असून जखमींना लक्ष्मेश्वर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना लक्ष्मेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

  यशचे आगामी चित्रपट

  दाक्षिणात्य अभिनेता यशच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, यावर्षी त्याचा एकही चित्रपट प्रदर्शित होणार नसल्याचे बोलले जात आहे. त्याच वेळी, अलीकडेच त्याने त्याच्या आगामी टॉक्सिक चित्रपटाची क्लिप शेअर करून चित्रपटाची घोषणा केली. हा चित्रपट 10 एप्रिल 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ड्रग्ज माफियांवर आधारित असणार आहे. याशिवाय त्याच्या KGF या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाचीही चाहते वाट पाहत आहेत. बातमी अशी आहे की KGF 3 ची कथा तयार आहे आणि निर्माते लवकरच त्याचे शूटिंग सुरू करणार आहेत.

  केजीएफनं केलं स्टार

  दाक्षिणात्य अभिनेता यशने 2007 मध्ये करिअरला सुरुवात केली. मात्र, 2018 मध्ये आलेल्या KGF 1 चित्रपटातून त्याला खरी ओळख मिळाली. 2022 मध्ये रिलीज झालेल्या KGF 2 ने त्याला जगभरात ओळख मिळवून दिली आणि त्याला रॉकिंग स्टार म्हटले गेले. या चित्रपटाने 1250 कोटींची कमाई केली होती.