१९९० च्या दशकापासून ‘हे दोन अभिनेते’ खान मंडळीना देतायेत टक्कर, स्पर्धेत टिकून आजही यांचे नाणे खणखणीत

१९९० साली शाहरुख खान, आमीर खान आणि सैफ अली खान (Shah Rukh Khan, Aamir Khan and Saif Ali Khan) ही खान मंडळींनी बॉलिवूडमध्ये प्रवेश करत एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले. याचवेळी अजय देवगण, अक्षयकुमार, (Ajay Devgan, Akshay Kumar) सनी देओल, संजय दत्त, सुनिल शेट्टी, जॅकी श्रॉफ आदी अभिनेते सुद्धा चित्रपटात काम करत होते.

    मुंबई : क्रिकेट आणि चित्रपट (Cricket and movie) हे भारतीयांचे जिव्हाळाचे व आपुलकीचे विषय, खेळाडूना व अभिनेत्यांना देशातील लोक कधी देवपण देतील व कधी लाखोली वाहतील याचा नेम नाही. पण बॉलिवूडमधील (Bollywood) काही काही अभिनेत्यांना चाहते अक्षरश: देव मानतात. बॉलिवूडमुळं अर्थव्यवस्थेला (Economics) चालना मिळते, त्याचबरोबर अनेकांना रोजगाराचे साधन निर्माण होते. दादासाहेब फाळके (Dadasaheb phalke) यांना भारतीय चित्रपटाचे शिल्पकार मानले जाते. त्यामुळं बॉलिवूडमुळे अनेकांची पोटं भरतात. तसेच अनेक अभिनेत्यांच्या नावावर बॉक्स ऑफिसवर चित्रपट चालतात, कोटींचा गल्ला जमवतात. १९७०-८० च्याआधी बॉलिवूड म्हटले की, कपूर खानदानाची (Kapor family) मक्तेदारी समजली जायची, हळूहळू यात बदल होत गेला. आणि राजेश खन्ना, धर्मेद, अभिताभ बच्चन आदी अभिनेत्यांनी आपली छटा उमटवली. (Rajesh Khanna, Dharmed, Abhithab Bachchan)

    दरम्यान, काळ जसा पुढे गेला तसा नवीन अभिनेत्यांची फळी सुद्धा उदयास आली. १९९० साली शाहरुख खान, सलमान खान, आमीर खान आणि सैफ अली खान (Shah Rukh Khan, Salman khan, Aamir Khan and Saif Ali Khan) ही खान मंडळींनी बॉलिवूडमध्ये प्रवेश करत एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले. याचवेळी अजय देवगण, अक्षयकुमार, (Ajay Devgan, Akshay Kumar) सनी देओल, संजय दत्त, सुनिल शेट्टी, जॅकी श्रॉफ आदी अभिनेते सुद्धा चित्रपटात काम करत होते. पण जेव्हा खान मंडळींनी १९९० पासून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला, तेव्हापासून अजय देवगण, अक्षयकुमार यांनी सुद्धा प्रवेश केला. पण तेव्हापासून आजपर्यंत तीन खान मंडळींना टक्कर देणारे मोजकेच आज अभिनेते उरले आहेत. त्यापैकी फक्त अजय देवगण व अक्षयकुमार हे दोनच अभिनेते उरले आहेत. असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

    आजही बॉक्स ऑफिसवर खान मंडळीचे चित्रपट कोटीचा गल्ला जमवतात, त्यापैकी फक्त अजय देवगण व अक्षयकुमार हे दोनच अभिनेते खान मंडळींना टक्कर देत असून, आजही हे दोन अभिनेते स्पर्धेत टिकून असून, आपले नाणे खणखणीत असल्याचे दाखवून देत आहेत. कारण १९९० पासून म्हणजे साधरण तीस वर्षापासून अजय देवगण व अक्षयकुमार हे दोनच अभिनेते खान मंडळीना टक्कर देत, आजही टिकून आहेत, आपले चित्रपट हिट करुन दाखवत आहेत.