खेसारी लाल यादव ‘ट्यूशन वाली’ गाण्यात आस्था सिंगसोबत दिसला रोमान्स करताना, पहा व्हिडिओ

भोजपुरी अभिनेता आणि गायक खेसारी लाल यादव याचं नवीन गाणं 'ट्यूशन वाली' रिलीज झालं आहे. या गाण्यात अभिनेता अभिनेत्री आस्था सिंगसोबत रोमान्स करताना दिसत आहे. हे गाणं खेसारी लाल यादव आणि नेहा राज यांनी गायलं आहे. पवन पांडे यांनी या गाण्याचे बोल लिहिले असून श्याम सुंदर यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. आदिशक्ती फिल्म्सच्या यूट्यूब चॅनलवर हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. आतापर्यंत 26 लाखांहून अधिक लोकांनी हे गाणं पाहिले आहे, तर 170 हजार लोकांनी या गाण्याला लाईक देखील केले आहे.