खेसारी लाल यादवचं नवीन गाणं ‘मकई के बाल ले लs’ रिलीज, पहा व्हिडिओ

भोजपुरी अभिनेता आणि गायक खेसारी लाल यादवचं नवीन गाणं 'मकई के बल ले लs' रिलीज झालं आहे.

    भोजपुरी अभिनेता आणि गायक खेसारी लाल यादवचं नवीन गाणं ‘मकई के बल ले लs’ रिलीज झालं आहे. या व्हिडिओ गाण्यात अभिनेता हातगाडीवर मका विकताना दिसत आहे. हे गाणं खेसारी लाल यादव आणि शिल्पी राज यांनी गायलं आहे. विजय चौहान यांनी या गाण्याचे बोल लिहिले असून आर्या शर्माने संगीत दिलं आहे. हे गाणं शिवाय फिल्म्स ऑफिशियलच्या यूट्यूब चॅनलवर स्ट्रीम होत आहे. हे गाणं आतापर्यंत सहा लाखांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. त्याचबरोबर या गाण्याला आतापर्यंत 106 हजार लोकांनी लाइक केलंय.