khichdi 2 parekh family

‘खिचडी 2’ चा टीझर रिलीज करत चित्रपट दिवाळीत रिलीज होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

    विनोदी मालिकांमध्ये आजही ‘खिचडी’(Khichdi) या मालिकेचं नाव आवर्जून घेतलं जातं. या मालिकेतलं पारेख कुटुंब पुन्हा तुम्हाला हसवण्यासाठी सज्ज झालं आहे. प्रफुल्ल, बाबूजू, हिमांशू, हंसा आणि जयश्री ही सगळी पात्रं आपल्या भेटीला येणार आहेत. याआधी 2010 मध्ये ‘खिचडी’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता 2023च्या दिवाळीत ‘खिचडी 2’ चित्रपट रिलीज होणार आहे. त्यामुळे 13 वर्षांनंतर पुन्हा एकदा दिवाळीत (Diwali 2023) हास्याचे फटाके फुटणार आहेत. नुकताच ‘खिचडी 2’ चा टीझर रिलीज करत चित्रपट दिवाळीत रिलीज होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.(Khichdi 2 Date Announcement)

    टीझरमध्ये ‘खिचडी’ चित्रपटामधील कलाकार तसेच दिग्दर्शिका फराह खान देखील आहे. फराह खाननं ‘खिचडी’ या चित्रपटातदेखील कॅमिओ केला होता. आता ती ‘खिचडी-2’ चित्रपटात देखील दिसतेय. टीझरमध्ये पारेख कुटुंबाचा कॉमेडी अंदाज दिसतोय. या टीझरच्या शेवटी ‘खिचडी 2-मिशन पंथुकिस्तान’ असं लिहिलेलं दिसत आहे.

    ‘खिचडी 2’ (Khichdi 2) या चित्रपटात हंसा पारेख ही व्यक्तिरेखा सुप्रिया पाठक (Supriya Pathak) यांनी साकारली आहे. त्यांच्या विनोदी शैलीनं अनेकांची मनं जिंकली होती. सुप्रिया पाठक कपूर, राजीव मेहता ( Rajeev Mehta), अनंग देसाई (Anang Desai), वंदना पाठक (Vandana Pathak), कीर्ती कुल्हारी (Kirti Kulhari) आणि जमनादास मजेठिया हे कलाकार ‘खिचडी 2’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहेत.

    अभिनेत्री निमिषा वखारिया (Nimisha Vakharia) यांनी ‘खिचडी’ या चित्रपटात जयश्री ही भूमिका साकारली होती. आता ‘खिचडी-2’ (Khichdi 2) चित्रपटामधील ही भूमिका अभिनेत्री वंदना पाठक या साकारणार आहेत.प्रेक्षक ‘खिचडी 2’ चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.