kiara trolled for holding tiranga wrong

कियाराचा एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होतोय. वाघा- अटारी बॉर्डरवर केलेल्या एका चुकीमुळे कियारा ट्रोल झाली आहे.

  अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) नुकतीच वाघा- अटारी बॉर्डरवर गेली होती. या ठिकाणचे तिचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले.(Kiara On Wagha Border) पण वाघा- अटारी बॉर्डरवर केलेल्या एका चुकीमुळे कियारा ट्रोल झाली आहे.(Kiara Advani Video)

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Varinder Chawla (@varindertchawla)

  कियाराचा एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये तिच्या हातात तिरंगा दिसतोय. मात्र तिला ध्वज फडकवण्यासाठी तो कसा धरायला हवा, हेदेखील कळत नाहीये. तिच्या शेजारी उभा असलेला BSF जवान तिला कसा ध्वज पकडायला हवा हे सांगताना दिसतोय. तिरंगा फडकवण्यापेक्षा तिला स्वत:च्या फोटोसाठी पोज देण्यात जास्त रस असल्याचं दिसतंय.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Kiara Advani FP (@my_favourite_kiara)

  तिच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट केली आहे की, तिरंगा आपल्या देशाची शान आहे कृपया फोटोशूटसाठी त्याचा खेळण्यासारखा वापर करू नका. दुसऱ्या एकाने लिहलं आहे की आजपर्यंत मी अशी कोणतीही व्यक्ती बघितली नव्हती जिला तिरंगा फडकवता येत नाही. कियारा आपली देशभक्ती दाखवायला वाघा बॉर्डरवर गेली पण तिच्या तिरंगा चुकीच्या पद्धतीने पकडण्याच्या कृतीमुळे ती चांगलीच ट्रोल झाली आहे.