…..म्हणून किरण खेर यांनी कॅमेरासमोर येण्यास दिला नकार!

या व्हिडीओची सुरुवात अनुमप खेर यांच्यापासून झाल्याचं दिसतंय. व्हिडीओच्या सुरुवातीला अनुपम खेर यांच्य़ाशी सिकंदर संवाद साधताना दिसतोय़.

    अभिनेत्री आणि खासदार किरण खेर यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. किरण यांचा मुलगा सिंकदर खेरने हा व्हिडीओ रेकॉर्ड केलाय. मात्र सिकंदरच्या या नव्या व्हिडीओत किरण खेर यांनी कॅमेरासमोर येण्यास नकार दिलाय. सिकंदरने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केलाय.

    या व्हिडीओची सुरुवात अनुमप खेर यांच्यापासून झाल्याचं दिसतंय. व्हिडीओच्या सुरुवातीला अनुपम खेर यांच्य़ाशी सिकंदर संवाद साधताना दिसतोय़. त्यानंतर सोफ्यावर किरण खेर यांचे पाय दिसून येत आहेत. पायानींच त्या हाय करतात. यावर अनुपम खेर सिकंदरला त्याने किरण खेर यांचा व्हिडीओ रेकॉर्ड करावा असा सल्ला देतात. मात्र किरण खेर यासाठी नकार देतात. “मी आता लिपस्किट पण नाही लावली, मल नाही करायचं.” असं किरण खेर या व्हिडीओत म्हणत आहेत.

    या व्हिडीओत किरण खेर यांचा फक्त आवाज ऐकू येतोय. एप्रिल महिन्यात किरण खेर यांना कॅन्सर झाल्याची माहिती अनुपम खेर यांनी दिली होती. सध्या किरण खेर यांची प्रकृती सुधारतेय.