‘जातवर्चस्ववादी विचारसरणीच्या…’; किरण मानेनं केतकीवर साधला निशाणा, म्हणाला ‘मी कित्येक वर्षे हे भोगतोय’

किरण मानेने लिहीलं आहे, 'केतकी चितळेची पोस्ट सगळ्यांनी वाचली असेलच. आता तुम्हाला सांगू इच्छीतो, अशा विकृत लोकांनी खच्चून भरलेल्या क्षेत्रात आम्ही करीयर करतोय....'

    अभिनेत्री केतकी चितळे सध्या तिच्या वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टमुळे पोलिसांच्या ताब्यात आहे. केतकीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar)  यांच्यावर एक पोस्ट करत टीका केली होती. पण आता केलेली टीका तिला चांगलीच भोवली आहे. तिला अटक करण्यात आली असून येत्या १८ मेपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणावर राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया देत याचा निषेध केला आहे. देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, अजित पवार यांनीही केतकीला खडेबोल सुनावले आहेत. याशिवाय आपल्या वादग्रस्त पोस्ट्समुळे नेहमीच चर्चेत राहणारा अभिनेता किरण मानेनेही केतकीवर टीका करत पोस्ट लिहीली आहे.

    किरण मानेने लिहीलं आहे, ‘केतकी चितळेची पोस्ट सगळ्यांनी वाचली असेलच. आता तुम्हाला सांगू इच्छीतो, अशा विकृत लोकांनी खच्चून भरलेल्या क्षेत्रात आम्ही करीयर करतोय. तुम्हाला ही प्रवृत्ती नविन असेल, आम्ही कित्येक वर्ष भोगतोय. विशेषत: जातवर्चस्ववादी विचारसरणीच्या केतकीसारख्या अनेक अभिनेत्री उन्माद आणि उच्छादाचा कळस करतात. मी स्वत: अशा दोन अभिनेत्रींचा जवळून अनुभव घेतलाय. त्यांच्या उन्मादानं बोलण्याला आपण विरोध केला की ‘लेडीज कार्ड’ खेळून ‘गैरवर्तना’चे खोटे आरोप करतात. माझ्यासमोर एकदा एका अभिनेत्रीने एका थोर महामानवाविषयी अपशब्द वापरले होते. मी तात्काळ विरोध केला. तो राग मनात ठेवून त्या जातवर्चस्ववादी अभिनेत्रीने मनूवादी कलाकारांचा ‘गट’ जमवला..हळूहळू कुरबूरी सुरू केल्या.. आणि… असो. बात निकलेगी तो दूSर तलक जायेगी.’

    अभिनेता किरण मानेही आपल्या वादग्रस्त पोस्ट्समुळे चर्चेत असतो. काहीच दिवसांपूर्वी त्याला मुलगी झाली ह या मालिकेतून काढण्यात आलं होतं. त्यानंतर त्याने अनेक आरोप केले होते. त्यामुळे तो चर्चेत आला होता. तसेच सातत्याने तो सोशल मीडियावर पोस्ट लिहीत असतो. अनेकदा त्याच्यावर टीकाही होते.

    दरम्यान केतकीने शरद पवारांनी त्यांच्या एका सभेत म्हटलेल्या कवीतेनंतर एक कवीता सोशल मीडियावर पोस्ट केली होती. त्यानंतर हा सगळा वाद निर्माण झाला होता.

    केतकी सध्या पोलिस कोठडीत आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तिच्याविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.