
‘किचन कल्लाकार’(Kitchen Kallakar)मधील अनेक कलाकार हे ब्रेक घेत आहे. कलाकारांच्या व्यस्त शेड्युलचा परिणाम कार्यक्रमावर होताना दिसत आहे. यामुळे ‘किचन कल्लाकार’चा शो लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
झी मराठी वाहिनीवरील ‘किचन कल्लाकार’ ही अनेकांची आवडती मालिका आहे. मात्र आता झी मराठी वाहिनीवर ‘डान्स इंडिया डान्स’ हा नवीन रिॲलिटी शो सुरु होणार आहेत. या मालिकेमुळे झी मराठीवरील ‘किचन कल्लाकार’ ही मालिका बंद होणार असल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत झी मराठीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून ‘किचन कल्लाकार’ या मालिकेत बदल दिसत आहेत. ‘किचन कल्लाकार’ या मालिकेत महाराज या भूमिकेत असलेले अभिनेते प्रशांत दामले यांची जागा निर्मिती सावंत सांभाळत आहेत. तर सूत्रसंचालक संकर्षण कऱ्हाडे हा नाटकांच्या दौऱ्यात व्यस्त असल्याने त्याच्या जागी श्रेया बुगडे पाहायला मिळत आहे. संकर्षण हा ‘तू म्हणशील तसं’ या नाटकाच्या दौऱ्यासाठी लंडनला गेला आहे. त्याच्यासोबत प्रशांत दामलेदेखील ‘सारखं काहीतरी होतंय’ या नाटकानिमित्त लंडनला रवाना झाले आहेत. ‘तू म्हणशील तसं’ या नाटकात संकर्षण मुख्य भूमिका साकारत आहे. त्याच्यासोबत या नाटकाचे दिग्दर्शन त्याने केले आहे.
View this post on Instagram
‘किचन कल्लाकार’मधील अनेक कलाकार हे ब्रेक घेत आहे. कलाकारांच्या व्यस्त शेड्युलचा परिणाम कार्यक्रमावर होताना दिसत आहे. यामुळे ‘किचन कल्लाकार’चा शो लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही भागांपासून या शोमध्ये अनेक बदल होत असल्यामुळे हा कार्यक्रम बंद होणार आहे.
या कार्यक्रमाच्या ऐवजी झी मराठी वाहिनीवर ‘डान्स इंडिया डान्स’ हा नवा रिॲलिटी शो दाखल होत आहे. छोट्या कलाकारांसाठी हा शो आयोजित करण्यात आला आहे. या शोमध्ये सहभागी होण्यासाठी बालकलाकरांची लगबग सुरु झाली आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून ऑडिशनद्वारे लिटिल मास्टर्सची निवड करण्यात येणार आहे.