अजित कुमार म्हणजेच खरा संतोष पोळ सध्या काय करतो माहितेय का?२०१६ साली झाली होती अ’टक.

सध्या ‘देवमाणूस’ मालिकेत अजितकुमारची उलट तपासणी चालू आहे. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला लागली असून आता मालिकेत पुढे काय होणार याकडे प्रेक्षक डोळे लावून बसले आहेत.

    ‘देवमाणूस’ ही मालिका सध्या बरीच गाजते आहे. ही मालिका एका खऱ्याखुऱ्या घटनेवर आधारीत आहे. होय, खऱ्या आयुष्यातल्या एका फसव्या आणि खुनी डॉक्टर वर ही मालिका बेतलेली आहे. डॉक्टरकीच्या बोगस प्रमाणपत्रावर एक कंपाउंडर पश्चिम महाराष्ट्रातल्या एका गावात जाऊन राहतो. तिथे आपला दवाखाना टाकून खऱ्या डॉक्टर सारखा वावरत असतो. पैशांसाठी बायकांना आपल्या जाळ्यात अडकवत असतो.

    पैसे मिळल्यानंतर तो त्यांचा खू-न करत असतो. दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांना नेहमी काहीतरी मोठा आजार झाल्याचे सांगून त्यांच्याकडून देखील पैसे उकळत असतो. जे कुणी त्याचे पितळ उघडे पाडण्याचा प्रयत्न करेल, तो त्याचाही खू-न करत असतो. असे त्याने तेरा वर्षांत सहा खू-न केले.

    भोळ्याभाबड्या गावकऱ्यांना ‘देवमाणूस’ वाटणारा हा बोगस डॉक्टर आपल्या चांगुलपणाच्या बुरख्यामागे मात्र लोकांचा कर्दनकाळ होता. कोण होता हा खु-नी डॉक्टर ज्याच्या या काळ्या कृत्यांवर ‘देवमाणूस’ ही मालिका आधारलेली आहे? त्याचे नाव आहे संतोष पोळ. त्याने ह-त्या केलेले मृ-तदेह तो एका फार्महाऊस मध्ये पुरत असे. त्याने सगळ्यात शेवटी मंगला जेधे या अंगणवाडी सेविकेची ह-त्या केली आणि ती उघडकीस आली. त्यामुळे संतोष पोळ पकडला गेला. त्याच्यावर पुढे खटला चालला आणि त्याला तुरुंगवासाची शिक्षा झाली.

    सध्या ‘देवमाणूस’ मालिकेत अजितकुमारची उलट तपासणी चालू आहे. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला लागली असून आता मालिकेत पुढे काय होणार याकडे प्रेक्षक डोळे लावून बसले आहेत. मालिकेत आता डॉ. कोलते यांची एन्ट्री होणार आहे. त्यांची साक्षच या घटनेला वेगळं वळण लावेल.

    खऱ्या आयुष्यातला अजितकुमार म्हणजेच संतोष पोळ सद्य तुरुंगात आपले जीवन कंठत आहे. २०१६ मध्ये त्याला अटक झाली. आता तो कोल्हापूरच्या कळंबा जे-ल मध्ये शिक्षा भोगत आहे.