क्रिती खरबंदा आणि पुलकित सम्राट अडकले लग्नबंधनात, पहिला फोटो आला समोर!

अनेक दिवसाच्या डेटींग नंतर पुलकीत सम्राट आणि क्रिती खरबंदा लग्नबंधनात अडकले. दिल्ली एनसीआरच्या मानेसर येथे पुलकित आणि क्रितीचे लग्न पार पडलं.

  यावर्षी अनेक बॅालिवूड कलाकारांनी त्यांच्या आयुष्याची नवी सुरुवात केली. काही दिवसापुर्वी अभिनेत्री रकुल प्रित सिंह आणि जॅगी भगनानीने लग्नगाठ बांधली. आता बॅालिवूडमधील आणकी एक कपल विवाहबंधनात अडकलं आहे. अभिनेत्री क्रिती खरबंदा आणि अभिनेता पुलकित सम्राट हे दोघं कायमचे लग्नबंधनात (Kriti Kharbanda Pulkit Samrat wedding) अडकले आहेत. अनेक वर्ष डेटिंग केल्यानंतर या जोडप्याने त्यांच्या नात्याला नवं नाव देत पुढे नेले आहे. दिल्ली एनसीआरमधील हॉटेल ITC ग्रँड भारत पॅलेसमध्ये हा विवाह सोहळा पार पडला. त्यांच्या लग्नाचा पहिला फोटो नुकताच समोर आला आहे. या फोटोवर चाहत्यांसहीत सेलेब्रिटिही कमेंट करुन त्यांना लग्नाच्या शुभेच्छा देत आहेत.

  पुलकित आणि क्रितीचं लग्न

  पुलकित आणि क्रितीने शुक्रवारी कुटुंब आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत दिल्ली एनसीआर येथील मानेसर येथे लग्न केलं. यावेळी क्रितीने गुलाबी रंगाचा लेहंदा घातला होता. या लेहेंग्यात ती खुपच सुंदर दिसत आहे. दरम्यान, पुलकित हिरव्या शेरवानीमध्ये राजकुमारपेक्षा कमी दिसत नव्हता. पुलकितच्या शेरवानीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पुलकितच्या शेरवानीत गायत्री मंत्र पाहायला मिळला.

   चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

  पुलकित आणि क्रितीच्या फोटोेनी इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे.सोशल मीडियावर चाहते पुलकित आणि क्रितीला खूप शुभेच्छा देत आहेत. े एका यूजरने लिहिले की, ‘अखेर अनेक वर्षे डेटिंग यशस्वी झाली.’ आणखी एका यूजरने लिहिले की, ‘क्रिती आणि पुलकितला त्यांच्या लग्नाबद्दल खूप खूप शुभेच्छा. तुम्ही दोघेही कायम सोबत राहू द्या. दोघांनीही हा अतिशय चांगला निर्णय घेतला आहे. दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘क्रिती वधूच्या रूपात खूप सुंदर दिसत आहे. पुलकितही राजकुमारापेक्षा कमी दिसत नाही.

  मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा यांच्या लग्नासाठी एक शानदार मेनू तयार करण्यात आला आहे. यामध्ये दिल्लीच्या प्रसिद्ध चाटपासून ते देशभरातील प्रसिद्ध पदार्थांचा समावेश होता. मेनूमध्ये एकट्या दिल्ली शहरातील सहा वेगवेगळ्या प्रसिद्ध ठिकाणांच्या चाटांचा समावेश होता. याशिवाय कोलकाता, वाराणसी, राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध पदार्थही पाहुण्यांना देण्यात आले.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Kriti Kharbanda (@kriti.kharbanda)