rocky aur rani ki prem kahani

‘मिट दि रंधवास’ अशी ओळख करून देणाऱ्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’च्या पोस्टरमध्ये रणवीर सिंग,धर्मेंद्र, जया बच्चन या मोठ्या चेहऱ्यासोबतच एक मराठी चेहरा झळकत आहे. हा चेहरा म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील यशस्वी अभिनेत्री, निर्माती क्षिती जोग

    करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (Rocky Aur Rani Kii Prem Kahaani) या चित्रपटाचे जबरदस्त पोस्टर सोशल मीडियावर झळकलं आहे. ‘मिट दि रंधवास’ अशी ओळख करून देणाऱ्या या पोस्टरमध्ये रणवीर सिंग (Ranveer Singh),धर्मेंद्र, जया बच्चन या मोठ्या चेहऱ्यासोबतच एक मराठी चेहरा झळकत आहे. हा चेहरा म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील यशस्वी अभिनेत्री, निर्माती क्षिती जोग (Kshitee Jog). या चित्रपटात क्षिती एका महत्वपूर्ण आणि रंजक भूमिकेत दिसणार आहे.

    इतक्या मोठ्या स्टारकास्टसोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दल क्षिती म्हणते, “अनेक वर्ष रुपेरी पडद्यावर अधिराज्य गाजवणाऱ्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मला मिळाली आहे, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. ज्येष्ठच नाही तर आताच्या काळात सुपरहिट असलेला रणवीर सिंग, आलिया भट्ट यांच्यासोबत काम करताना प्रचंड धमाल आली. धर्मा प्रॉडक्शन, करण जोहर यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव अफलातून होता. करण सर एक उत्तम दिग्दर्शक आहेत. समोरच्याकडून अपेक्षित सीन कसा करून घ्यायचा याचे कसब त्यांच्याकडे उत्तम आहे. एकंदरच ही प्रक्रिया खूप छान होती.”

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)

    खास दिवशी पोस्टर रिलीज
    येत्या 28 जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. रणवीर सिंग आणि आलिया भट्टच्या आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चं पोस्टर आज रिलीज करण्यात आलं आहे. करण जोहरने बॉलिवूडमध्ये 25 वर्ष पूर्ण केली आहेत. त्या निमित्ताने हे पोस्टर रिलीज करण्यात आलं. सोशल मीडियावर आलिया आणि रणवीरने पोस्टर पोस्ट केली आहे. करण जोहर दिग्दर्शक म्हणून कमबॅक करणार आहे.

    या व्हॅलेंटाईन डेला हा सिनेमा रिलीज होणार होता. मात्र, शूटिंग पूर्ण न झाल्याने या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. इशिता मोईत्रा, शशांक खेतान आणि सुमित रॉय यांनी लिहिलेल्या या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.