LAGKALLOL

मयूर तिरमखे फिल्म्स प्रस्तुत आणि मोहम्मद बर्मावाला दिग्दर्शित ‘लग्नकल्लोळ’ हा चित्रपट लग्नाच्या एका वेगळ्या पैलूवर प्रकाशझोत टाकणारा आहे.  या सिनेमात सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधान, मयुरी देशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहे. या सिनेमाचं मोशन पोस्टर(Lagnkallol Motion Poster) नुकतंच समोर आलं आहे.

    ‘लग्न पहावे करून’, असे अनेकदा म्हटले जाते. लग्न ही बाब एकच असली तरी त्याची प्रत्येकाची कहाणी वेगवेगळी असते. याच लग्नसंस्थेवर भाष्य करणारा ‘लग्नकल्लोळ’(Lagnkallol) हा थोडासा वेगळ्या धाटणीचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

    मयूर तिरमखे फिल्म्स प्रस्तुत आणि मोहम्मद बर्मावाला दिग्दर्शित ‘लग्नकल्लोळ’ हा चित्रपट लग्नाच्या एका वेगळ्या पैलूवर प्रकाशझोत टाकणारा आहे.  या सिनेमात सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधान, मयुरी देशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहे. या सिनेमाचं मोशन पोस्टर(Lagnkallol Motion Poster) नुकतंच समोर आलं आहे.

    अभिनेत्री मयुरी देशमुखने या सिनेमाचं मोशन पोस्टर शेअर केलं आहे. आपल्या पोस्टमध्ये ती म्हणते, ‘कोरोनाचा गोंधळ आणि क्वारंटाईनचा घोळ, अख्ख्या महाराष्ट्रासाठी मनोरंजनाची लस घेऊन लवकरंच येतोय’.

    लग्नकल्लोळ या सिनेमात भारत गणेशपुरे,प्रिया बेर्डे, प्रतीक्षा लोणकर,सुप्रिया कर्णिक, विद्या करंजीकर, अमिता कुलकर्णी, संतोष तिरमखे आणि डॉ. आशिष गोखले हे कलाकार देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.