‘लाल सलाम’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज, छोट्या पण दमदार भूमिकेत रजनिकांत, कपिल देव यांचा कॅमिओ!

निर्मात्यांनी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे, जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या चित्रपटात विक्रांत आणि विष्णू मुख्य भूमिकेत आहेत. रजनीकांत त्यांच्या मुलीच्या चित्रपटातही छोट्या भूमिकेत दिसणार आहेत.

  दाक्षिणात्य सुपरस्टार रंजनीकांत (Ranikant) यांचे जगभरात चाहते आहे. त्यांचा चित्रपट सिनेगृहात पाहायला जाणं म्हणजे प्रेक्षकांसाठी एखाद्या उत्सवापेक्षा कमी नसतं. काही दिवसापुर्वी त्यांचा जेलर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पंसतीस उतरला होता. आता पुन्हा एकदा थलाईवा एका दमदार चित्रपट घेऊन येत आहे. रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्यानं दिग्दर्शित केलेल्या ‘लाल सलाम’ (Lal Salaam Trailer) या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे, जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या चित्रपटात विक्रांत आणि विष्णू मुख्य भूमिकेत आहेत. तर रजनीकांत छोट्या भूमिकेत दिसणार आहेत.

  कसा आहे लाल सलामचा ट्रेलर रिलीज

  ‘लाल सलाम’  चित्रपटाचा ट्रेलर तमिळ भाषेत रिलीज करण्यात आला जो क्रिकेट ड्रामासह धर्म, राजकारण आणि सत्ता या विषयांभोवती फिरताना दाखवत आहे. चित्रपटात विक्रांत आणि विष्णू विशाल हे मुख्य कलाकार क्रिकेटपटूंच्या भूमिकेत दिसत आहेत. चाहत्यांसाठी एक सरप्राईज म्हणजे क्रिकेटचा देव म्हण्टले जाणारे क्रिकेटर कपिल देव (Kapil)  यांचीही झलकही ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.

  कपिल देव करणार कॅमिओ

  चित्रपटात रजनीकांत मोईदीन भाईच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे संगीत ऑस्कर विजेते संगीतकार ए आर रहमान यांनी दिले आहे. तामिळ, तेलुगू, हिंदी, मल्याळम आणि कन्नड भाषेत तो चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये चित्रपटाच्या निर्मितीला सुरुवात झाली आणि मुंबई, चेन्नई आणि पुद्दुचेरी येथे शूटिंग झाले. गेल्या वर्षी, सेटवरील रजनीकांत आणि कपिल देव यांचे एक चित्र देखील ऑनलाइन समोर आले होते आणि त्याच्या पोस्टमध्ये अभिनेत्याने म्हटले होते की महान क्रिकेटरसोबत काम करणे हे त्याचे भाग्य आहे.

  हा चित्रपट ऐश्वर्या रजनीकांत यांनी दिग्दर्शित केला आहे आणि 9 फेब्रुवारी 2024 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट पोंगलच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र 9 फेब्रुवारीला रिलीज करण्यात येणार आहे. आता चाहतेही चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.