lalu yadav

अनेक नेत्यांचे बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. नितीन गडकरी यांचा बायोपिक असलेला ‘गडकरी’ हा चित्रपट देखील नुकताच रिलीज झाला आहे.

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या आयुष्यावर आधारित ‘गडकरी’ हा बायोपिक नुकताच रिलीज झाला. आता बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या बायोपिकमध्ये (Lalu Prashad Yadav Biopic) कोणत्या अभिनेत्याची वर्णी लागणार, हे पाहावं लागेल.

    प्रकाश झा आणि तेजस्वी यादव यांची निर्मिती
    राष्ट्रीय जनता पक्षाने लालू यादव प्रसाद यादव यांच्या बायोपिकची माहिती दिली आहे. गेल्या 5-6 महिन्यांपासून चित्रपटावर काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या चित्रपटाचे राइट्स यादव कुटुंबाने घेतले आहेत. या चित्रपटाची निर्मिती प्रकाश झा यांच्या प्रोडक्शन हाऊसद्वारे केली जाणार आहे. तेजस्वी प्रसाद या चित्रपटात पैसे गुंतवत असल्याचीही चर्चा आहे.

    लालूंच्या बायोपिकचं नाव – लालटेन ?
    लालू प्रसाद यादव यांच्या बायोपिकमधील स्टारकास्टबाबत अद्याप सविस्तर माहिती समोर आलेली नाही. सूत्राने सांगितले की, चित्रपटामध्ये हिंदी चित्रपटसृष्टीमधील काही कलाकार काम करणार आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. लालू प्रसाद यादव यांच्या या बायोपिकचे नाव लालटेन, असेल असंही म्हटलं जात आहे. कारण ते त्यांच्या राजकीय पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे. पण बायोपिकच्या नावाबद्दल अधिकृत घोषणा झालेली नाही.

    गडकरींचा बायोपिक
    अनेक नेत्यांचे बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. नितीन गडकरी यांचा बायोपिक असलेला ‘गडकरी’ हा चित्रपट देखील नुकताच रिलीज झाला आहे. या बायोपिकमध्ये नितीन गडकरी यांची भूमिका राहुल चोपडा साकारणार आहेत. तर त्यांच्या पत्नीची म्हणजेच कांचन गडकरी यांची भूमिका ऐश्वर्या डोरले साकारणार आहे.