PDS लिमिटेडचे अध्यक्ष दीपक सेठ यांच्या ‘रेझोल्युट बाय डिझाइन’ या पुस्तकाचे अनावरण

सेठ यांनी जगातील सर्वांत विश्वासार्ह फॅशन व रिटेल उद्योगाची निर्मिती केली असून, त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाचे व आयुष्यात त्यांनी घेतलेल्या धड्यांचे चित्रण या पुस्तकात करण्यात आले आहे.

  • राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते झाले प्रकाशन

मुंबई : PDS लिमिटेड ही एक जागतिक फॅशन संरचना कंपनी (A Global Fashion Structure Company) असून, जगातील काही आघाडीच्या ब्रॅण्ड्स व रिटेलर्सना संपूर्ण कस्टमाइझ्ड फॅशन व रिटेल सोल्युशन्स पुरवते. आज महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी PDS लिमिटेडचे अध्यक्ष दीपक सेठ (Director, Deepak Sheth) यांच्या ‘रेझोल्युट बाय डिझाइन’ (Resolute By Design) या चरित्राचे अनावरण व प्रकाशन, आज राजभवनात (RajBhavan, Mumbai) झालेल्या एका सोहळ्यात, केले.

सेठ यांनी जगातील सर्वांत विश्वासार्ह फॅशन व रिटेल उद्योगाची निर्मिती केली असून, त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाचे व आयुष्यात त्यांनी घेतलेल्या धड्यांचे चित्रण या पुस्तकात करण्यात आले आहे.

दीपक सेठ यांची जडणघडण तसेच यशस्वी जागतिक उद्योग उभारण्यासाठी या व्यवसायात त्यांनी केलेला पाच दशकांचा प्रवास हे सर्व पुस्तकात क्रमवार आले आहे. त्यांचे बालपण व तारुण्याचा काळ या पुस्तकात आला आहे. त्यांना आजच्या तारखेपर्यंत मार्गदर्शन करणारे धडे व तत्त्वांबद्दल यात बरेच काही आहे. ६,००० शर्टांच्या साध्या ऑर्डरपासून सुरू झालेला उद्योग सर्व भौगोलिक प्रदेशांमध्ये व उत्पादन वर्गांमध्ये कसा विस्तारत गेला हे उलगडणाऱ्या या पुस्तकात अनेक रोमांचक क्षण आहेत.

दीपक यांनी उभारलेल्या भक्कम पायावर आपली उत्तम व्यवसाय कौशल्ये व जागतिक अनुभव यांचा कळस चढवत PDS चे उपाध्यक्ष पल्लक सेठ यांनी उद्योग नवीन उंचीवर नेला आहे. पल्लक यांनी PDS ला एका एकेरी घटकापासून उद्योजक महासंघापर्यंत तसेच फॅशन व रिटेल सोल्युशन्स देणाऱ्या समन्वयात्मक प्लॅटफॉर्मपर्यंत नेले. त्यांच्या धोरणात्मक दृष्टीच्या पायावर समूह CEO संजय जैन हे आटोपशीर व चपळ प्रारूप आणखी पुढे घेऊन जात आहेत.

हे प्रारूप डिझाइन-लेड सोर्सिंग, सेवा म्हणून सोर्सिंग, तयार कपड्यांचे उत्पादन व रिटेल ग्राहकांसाठी ब्रॅण्ड्स अशा सेवा देत आहेत. हे दोन्ही नेते एकत्रितपणे दमदार धोरण आखत आहेत आणि त्याद्वारे उत्तम कामगिरी करत आहेत, हे FY 22 मध्ये नोंदवल्या गेलेल्या १.२ अब्ज डॉलर्सच्या उलाढालीतून स्पष्ट होत आहे.

पल्लक सेठ या चरित्राबद्दल म्हणाले, “आमचे आदरणीय अध्यक्ष दीपक सेठ यांची कहाणी ‘रेझोल्युट बाय डिझाइन’ या पुस्तकाच्या माध्यमातून सर्वांना सांगणे आमच्यासाठी खूपच अभिमानास्पद बाब आहे. त्यांचा उद्योजकतेचा प्रवास आमच्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे आणि ते जे काही शिकले ते मुद्रित स्वरूपात अमर करून ठेवण्यात आले आहे. हे पुस्तक वाचण्याचा अनुभव अफलातून आहे! ‘रेझोल्युट बाय डिझाइन’ या पुस्तकामुळे अधिकाधिक लोकांना प्रेरणा मिळणार आहे आणि केवळ एका आदरणीय उद्योजकाच्याच नव्हे, तर एका कुटुंबवत्सल व्यक्तीच्या, मित्राच्या आणि उदार परोपकाऱ्याच्या आयुष्यात डोकावण्याची संधी वाचकांनी मिळणार आहे, कारण माझ्या वडिलांमध्ये हे सगळे गुण आहेत.”

सेठ यांच्याकडून टीमला सातत्याने जे चातुर्याचे, ज्ञानाचे व अनुभवाचे धडे मिळतात त्याबद्दल संजय जैन म्हणाले, “दीपक सेठ हे खऱ्या अर्थाने द्रष्टे आहेत आणि त्यांना भेटणाऱ्या प्रत्येकाला त्यांची दुर्दम्य उत्कृष्टता स्पर्श करून जातात. PDS चे यश हे केवळ अपघात नाही; तर सुस्पष्ट उद्दिष्ट व आमच्या कंपनीत रुजलेली मूल्यांशी तडजोड न करणारी संस्कृती यांची ती परिणती आहे. सेठ यांच्या धोरणात्मक सल्ल्याने ती आणखी वाढली आहे. सेठ यांची मी उद्योगातील दिग्गज म्हणून प्रशंसा करतो. धैर्य व वैभव यांची ही अनन्यसाधारण कथा तरुण व्यावसायिकांच्या नवीन पिढीने वाचावी यासाठी मी आतूर आहे.”

भक्कम नेतृत्व, पर्यावरणविषयक, सामाजिक व प्रशासकीय मुद्दयांवर (ESG) दिलेला भर, आर्थिक वाढ, टेक-सॅव्ही प्लॅटफॉर्म आणि क्लाएंट्सना दर्जा व कार्यक्षमतेत नवोन्मेष आणण्याची क्षमता देणे ही PDSची बलस्थाने आहेत. कंपनी वाढत असताना तसेच चांगली कामगिरी करत असताना, तिची शाश्वत फॅशनप्रती बांधिलकी कायम आहे. FY2021-22 मध्ये कंपनीने सोर्सिंगला एक कस्टमाइझ्ड सोल्युशन सेवा म्हणून बळकट करून नवीन पाऊल टाकले. यासह PDSने आपल्या ग्राहकांसाठी अत्यंत एकात्मिक व विशेषीकृत सोर्सिंग सेवेच्या क्षेत्राचा पाया घातला आहे. आपल्या व्यवसाय प्रारूपाचा आवाका वाढवण्यावर, धोरणात्मक भागीदारींची जोपासना करण्यावर व वाढीच्या पुढील टप्प्यांमध्ये स्थित्यंतर करण्याच्या दृष्टीने दैनंदिन कामकाजाची पुनर्रचना करण्याच्या प्रयत्नांवर कंपनीने लक्ष केंद्रित केले आहे.