sadanand rane

‘लावणी कलावंत महासंघा’कडून (Lavani Kalavant Mahasangh) वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी विविध पुरस्कार दिले जातात. लोककलेमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या लोककलावंत तसेच पडद्यामागील कलाकारांना लावणी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. लावणी गौरव पुरस्कार (Lavani Gaurav Award 2022) नृत्य दिग्दर्शक २०२२ हा पुरस्कार लोककला लोकनृत्य अभ्यासक सदानंद राणे  (Sadanand Rane) यांना जाहीर झाला आहे.

    मुंबई: ‘लावणी कलावंत महासंघा’ (Lavani Kalavant Mahasangh)कडून देण्यात येणारा लावणी गौरव पुरस्कार (Lavani Gaurav Award) नृत्य दिग्दर्शक २०२२ हा पुरस्कार लोककला लोकनृत्य अभ्यासक सदानंद राणे  (Sadanand Rane) यांना जाहीर झाला आहे. ‘लावणी कलावंत महासंघा’कडून वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी विविध पुरस्कार दिले जातात. लोककलेमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या लोककलावंत तसेच पडद्यामागील कलाकारांना लावणी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. यावर्षी हा पुरस्कार वितरण सोहळा येत्या १ जून रोजी मान्यवरांच्या हस्ते दामोदर हॉल, परळ येथे होणार आहे.

    सदानंद राणे हे गेली ४० वर्षे लोककलेसाठी काम करत आहेत. लोककला-लोकनृत्य अभ्यासक, संशोधक, ज्येष्ठ नृत्य नाट्य दिग्दर्शक अशी त्यांची वेगळी ओळख आहे. विविध वाहिन्यांवरिल लोकनृत्याच्या कार्यक्रमाला परीक्षक म्हणून त्यांनी उत्तम काम केले आहे. शासनाच्या अनेक समितीचे ते सदस्य आणि पदाधिकारी असून सांस्कृतिक ग्रुपच्या माध्यमातून ते विविध लोककलांचा प्रचार आणि प्रसार करतात. त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे.

    याशिवाय या कार्यक्रमात कोविड काळात उल्लेखनीय कार्य केलेल्या कलाकारांना देवदूत सन्मान, कोविड काळात महासंघाला सहकार्य केलेल्या व्यक्तींना दानशूर सन्मान तर जागतिक महिला दिना निमित्ताने घेण्यात आलेल्या ‘मी आणि माझी कला’ या स्पर्धेतील विजेत्या महिलांना यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे.