काळजाचा ठाव घेणार ‘काटा किर्र’ ‘लावण्यवती’अल्बमचे अखेरचे गाणे भेटीला!

अवधूत गुप्ते यांनी शब्दबद्ध केलेल्या आणि संगीत दिलेल्या 'काटा किर्र' या गाण्याला मुग्धा कऱ्हाडेच्या ठसकेबाज आवाज लाभला आहे.

    ‘लावण्यवती’ अल्बमबद्दल अवधूत गुप्ते म्हणतात, “आपल्या महाराष्ट्राची लोककला जपली पाहिजे, यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो आणि म्हणून तुमच्यासाठी ‘लावण्यवती’ या अल्बममधील ‘काटा किर्र’ हे चौथे आणि शेवटचे गाणे तुमच्या भेटीला येत आहे. हे गाणे धमाल उडवून देणारे आणि प्रत्येकाला आवडेल अशी आहे.”