Salman khan (2)

सलमान खानच्या घराबाहेरील सकाळी गोळीबाराची घटना घडली होती. याची जबाबदारी एका व्यक्तीने स्वीकारली असून यामध्ये बिश्नोई गँगचा हात असल्याचा दावा केला जात आहे.

  मुंबई : आज सकाळच्या सुमारास अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर दुचाकीवर आलेल्या एकाने गोळीबार (Salman Khan House Firing News) केल्याची घटना घडली. या घटनेनं संपुर्ण मनोरंजन सृष्टीला धक्का बसला आहे. या प्रकरणी आता नवं अपडेट समोर आलं आहे.  या गोळीबाराची जबाबदारी एका व्यक्तीने स्वीकारली आहे. एका फेसबुक अकाऊंटवरील पोस्टद्वारे या गोळीबाराची सलमान खानच्या घराबाहेर गोळीबाराची जबाबदारी (Firing Outside Salman Khans House)  असून यामध्ये बिश्नोई गँगचा (Lawrence Bishnoi) हात असल्याचा दावा केला आहे. अनमोल बिश्नोई (Anml Bishnoi) नावाच्या व्यक्तीने आपण या गोळीबारामागे असल्याचं मान्य केलं आहे.

  सलमान खानच्या घरात घुसली गोळी

  रविवारी पहाडे पाच वाजता ही गोळीबाराची घटना घटल्याचं  सांगण्यात येत आहे. रविवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास भाईजान सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थाना बाहेर गोळीबार झाला. दोन अज्ञात व्यक्ति दुचाकीवरुन आले आणि त्यांनी घराच्या दिशेनं गोळीबार  करत पळ काढला. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या चार वॉचमनचे जबाब नोंदवले आहेत.

  या गोळीबारादरम्यान, सलमान खानच्या घरात एक गोळी घुसल्याचं देखील सीसीटिव्हीमधून समोर आलं आहे.  गॅलरीत असलेल्या पडद्यातून एक गोळी आरपार झाली. सुदैवाने पहाटेची वेळ असल्याने गॅलरीमध्ये कुणी नव्हतं, गॅलरी रिकामी होती. एकूण पाच गोळ्या झाडण्यात आल्याचं आता तपासात समोर आलं आहे. एक गोळी पडद्यातून आरपार गेली आणि एक गोळी भिंतीवर लागली, तर तीन पुंगळ्या रस्त्यावर सापडल्या आहेत.

  बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी

  या गोळीबार प्रकरणात बिश्नोई गँगचा हात असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला होता. यामुळे या प्रकरणाचा तपास एटीएसकडे देण्यात आला आहे. दरम्यान, अनमोल बिश्नोई नावाच्या अकाऊंटवरून या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र हे अकाउंट फेसबुक वर सर्च केलं जाऊ शकत नाही. अकाउंटबाबत रिस्ट्रीक्शन्स आहेत. पोलीस याची सत्यता पडताळून पाहत आहेत.

  मुख्यमंत्री शिंदेंनी सलमान खानला केला फोन

  मुख्यमंत्री शिंदे यांनी सलमान खानच्या घराची सुरक्षा वाढवण्याचे आदेश दिले आहेत. एएनआयच्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानशी फोनवर चर्चा केली आहे. याशिवाय मुंबई पोलीस आयुक्तांशी बोलून त्यांनी सलमान खानची सुरक्षा वाढवण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेनंतर सलमान खान कसा आहे हे राजकारणी राहुल कनाल यांनी सांगितले. पापाराझींना उत्तर देताना तो म्हणाला, ‘सलमान खान सध्या पूर्णपणे ठीक आहे.’