ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर, मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन!

आशा भोसले यांनी गाण्याच्या माध्यमातून अनके दशकं मराठी तसेच देशवासियांच्या मनावर राज्य केले. अजूनही त्यांची गाणी ऐकली जातात. मराठी, हिंदी तसेच इतर अनेक भाषांत त्यांना गायन केले.

    ख्यातनाम गायिका आशा भोसले यांना २०२० या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला समितीचे उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर आदी मान्यवर उपस्थित होते. आशा भोसले यांना हा पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आशाताईंचे अभिनंदन केले.

     

    आशा भोसले यांनी गाण्याच्या माध्यमातून अनके दशकं मराठी तसेच देशवासियांच्या मनावर राज्य केले. अजूनही त्यांची गाणी ऐकली जातात. मराठी, हिंदी तसेच इतर अनेक भाषांत त्यांना गायन केले. यापैकी मराठी भाषेतील त्यांनी गायलेली ‘मलमली तारुण्य माझे’, ‘केव्हातरी पाहाटे’, ‘बुगडी माझी सांडली गं’, अशी काही गीतं रसिकांना प्रचंड आवडली. आजपर्यत आशा भोसले यांनी हजारो गाणी गायली आहेत.