‘टायगर 3’ च्या क्रेझसमोर ‘लिओ’ चित्रपटाचा व्यवसाय मंदावला!

    लिओ बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस २४ : विजय थलापतीचा ‘लिओ’ चित्रपट १९ ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. मात्र आता चित्रपटाचा व्यवसाय मंदावायला लागला आहे. आत्तापर्यंत हा चित्रपट करोडोंची कमाई करत होता पण रिलीज होण्याआधीच ‘टायगर ३’ च्या क्रेझमुळे चित्रपटाची गती मंदावल्यासारखे दिसत आहे.

    ‘लिओ’ चित्रपट गेल्या दोन दिवसांपासून कोटींचा आकडा गाठण्यात अपयशी ठरला असून ‘लिओ’ची कमाई लाखांपुरतीच मर्यादित राहिली आहे. SACNILC च्या अहवालानुसार, ‘Leo’ ने २३ व्या दिवशी फक्त ४८ लाखांची कमाई केली होती. या चित्रपटाने लाखोंची कमाई करण्याची ही पहिलीच वेळ होती. आता २४ व्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे, त्यानुसार हा चित्रपट ९० लाख रुपये कमावणार आहे. यासह चित्रपटाचे एकूण कलेक्शन ३३६.५३ कोटी रुपये होईल.

    ‘टायगर 3’समोर ‘लिओ’चा व्यवसाय ठप्प?
    आज दिवाळीच्या मुहूर्तावर सलमान खानचा ‘टायगर ३’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची क्रेझ बऱ्याच दिवसांपासून पाहायला मिळत होती. जसजशी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ येत होती, तसतशी चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढत होती. अशा परिस्थितीत ‘लिओ’च्या कलेक्शनवर परिणाम झाला आणि चित्रपटाच्या व्यवसायात मोठी घसरण झाली.