ketaki chitale photo

केतकी चितळे (Ketaki Chitale) ही छोट्या पडद्यावरील अभिनेत्री असून ‘तुझं माझं ब्रेकअप’ या मालिकेत तिने भूमिका साकारली होती. मात्र या मालिकेनंतर ती फारशी कुठे दिसली नाही. केतकी तिच्या भूमिकांमुळे कमी तर सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टमुळेच अधिक चर्चेत असते.

  अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) आणि वाद हे खूप आधीपासूनचं समीकरण आहे. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि पोस्टमुळे चर्चेत असणाऱ्या केतकीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद पवारांबाबत (Sharad Pawar) वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिला ठाणे पोलिसांना ताब्यात घेतलं आहे.

  वकील नितीन भावे यांनी लिहिलेले कविता केतकी चितळेनं फेसबुकवरुन शेअर केली.

  फेसबुक पोस्टमध्ये काय ?

  तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll
  ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक
  सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll
  समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll
  ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll
  भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll
  खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll
  याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll

  या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत तिच्यावर टीका केली. केतकी याआधीही विविध कारणांमुळे चर्चेत राहिली. आपल्या वादग्रस्त पोस्टमुळे तिला अनेकदा ट्रोलिंगलाही (Trolling) सामोरं जावं लागलं. आजपर्यंत तिने अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केली आहेत.

  केतकी ही छोट्या पडद्यावरील अभिनेत्री असून ‘तुझं माझं ब्रेकअप’ या मालिकेत तिने भूमिका साकारली होती. मात्र या मालिकेनंतर ती फारशी कुठे दिसली नाही. केतकी तिच्या भूमिकांमुळे कमी तर सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टमुळेच अधिक चर्चेत असते. एपिलेप्सी या आजारावरील पोस्टमुळेही ती चर्चेत आली होती. किंबहुना याच आजारामुळे आपल्याला मालिकेतून काढून टाकण्यात आल्याचा आरोप तिने केला होता. या आजारावर केतकी वेगवेगळे उपचार घेत आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटचं नावदेखील ‘एपिलेप्सी वॉरियर क्वीन’ असं ठेवलं आहे.

  छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख
  स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआने छत्रपती शिवाजी महाराज आणि अरबी समुद्रातील स्मारकाबद्दल भाष्य केलं होतं. यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या होत्या. या प्रकरणानंतर अग्रिमाने माफी मागितली. मात्र त्यानंतर केतकीने छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी केल्याने शिवप्रेमी नाराज झाले होते. महाराजांनी दिलेली शिकवण विसरुन जात त्यांच्या नावावर राजकारण करण्याचा पोकळ विनोद करतात, असं केतकीने लिहिलं होतं. यामुळे केतकीला ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं.

  धर्म-पंथांचा अपमान
  केतकीनं सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये विविध धर्म-पंथांचा उल्लेख करत लिहिलं होतं, ‘नवबौद्ध, ६ डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क. आम्ही फक्त हिंदू,असा शब्द उद्गारला, तर घोर पापी, कट्टरवादी? पण अर्थात चूक कुणा दुसऱ्यांची नाही, तर आमचीच आहे. आम्ही स्वतःच्यातच भांडण्यात इतके बिझी आहोत, आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात आणि आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो, की स्वतःचा धर्म आम्ही विसरतो’, असं तिने लिहिलं. केतकीनं नवबौद्धांविषयी लिहिलेल्या वाक्यावरून नवी मुंबईतील आंबेडकरी चळवळीत सहभागी असणारे कार्यकर्ते स्वप्नील जगताप यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.