अखेर संस्कृत गुगल ट्रान्सलेटरवर; मैथिली, भोजपूरीसह ‘या’ २४ भाषांचाही समावेश

गुगलने आपल्या भाषांतर टूलमध्ये नवीन भाषा समाविष्ट केल्या आहेत. आत्तापर्यंत यात एकूण १३३ भाषांचे भाषांतर केलं जाऊ शकत होतं, मात्र गुगलने त्यात आणखी २४ भाषांचा समावेश केला आहे.

  सध्याच्या युगात गुगल ट्रान्सलेटरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अनेक भाषांचा गुगलने यात समावेश केला आहे. पण संस्कृत अद्यापही यात नव्हती. गुगलने आपल्या भाषांतर टूलमध्ये नवीन भाषा समाविष्ट केल्या आहेत. आत्तापर्यंत यात एकूण १३३ भाषांचे भाषांतर केलं जाऊ शकत होतं, मात्र गुगलने त्यात आणखी २४ भाषांचा समावेश केला आहे. समाविष्ट केलेल्या काही भाषा भारतात बोलल्या आणि लिहिल्या जातात. आसामीप्रमाणेच मैथली, भोजपुरी, संस्कृत आणि इतर भाषा जोडल्या गेल्या आहेत.

  याविषयी गुगलने म्हटलं आहे की, नवीन जोडलेल्या भाषा जगभरात ३०० दशलक्ष लोक वापरतात. त्यात मिझो भाषा आहे जी सुमारे 8 लाख लोक बोलतात. याशिवाय इथियोपिया आणि केनियामध्ये सुमारे ३७ दशलक्ष लोक ओरोमोचा वापर करतात.

  यातील भाषेला जोडण्यासाठी प्राध्यापकांची नोंदणी केली

  नव्याने सामिविष्ट केलेल्या भाषा जोडण्यासाठी, Google ने अनेक प्राध्यापक आणि भाषा तज्ञांचा समावेश केला आहे. जे या भाषा बोलतात. जीरो-शॉट मशीन ट्रान्सलेशनचा वापर करुन Google Translate मध्ये जोडलेल्या या पहिल्या भाषा आहेत.

  दरम्यान, हे तंत्रज्ञान मशीन लर्निंग मॉडेल वापरते जे शब्दशः दुसर्‍या भाषेत भाषांतरित करते. गुगलचे म्हणणे आहे की हे तंत्रज्ञान अद्याप पूर्णपणे अचूक नाही, परंतु कंपनीने वचन दिले आहे की आगामी काळात ते भाषांतरात सुधारणा करेल. लोकांना त्याचा चांगला अनुभव घेता येईल. कंपनीने नवीन वॉलेट अॅपच्या परिचयासह Wear OS आणि Android टॅब्लेटसाठी नवीन फीचर्सची घोषणा केली.

  या भाषा केल्या समाविष्ट

  • भोजपुरी – भारत, नेपाल आणि फिजीमध्ये जवळपास 5 कोटी लोक वापरतात.
  • मिजो- पूर्वोत्तर भारतात जवळपास 8 लाख 30 हजार लोग वापरतात
  • असमिया – पूर्वोत्तर भारत
  • मैथिली – उत्तर भारतात जवळपास 3.4 कोटी लोक वापरतात
  • मेइतेइलॉन (मणिपुरी) – पूर्वोत्तर भारतात जवळपास दोन कोटी लोक वापरतात
  • संस्कृत – भारतात जवळपास 20 हजार लोग वापरतात
  • कोंकणी- मध्य भारतात 20 लाख लोक वापरतात
  • ट्वी – घाना में जवळपास 1.1 कोटी लोक वापरतात
  • सोंगा – इस्वातिनी, मोज़ाम्बिक, दक्षिण अफ्रीका आणि ज़िम्बाब्वेत 70 लाख लोक वापरतात
  • टिग्रीन्या – इरिट्रिया आणि इथियोपियामध्ये जवळपास 80 लाख लोग इस्तेमाल करते हैं।
  • सेपेडी – दक्षिण अफ्रीका में करीब 1.4 करोड़ लोग लोक वापरतात
  • क्वेशुआ – पेरू, बोलीविया आणि इक्वाडोरमध्ये जवळपास एक कोटी लोक वापरतात
  • ओरोमो- इथियोपिया आणि केन्यामध्ये जवळपास 3.7 कोटी लोक वापरतात.
  • लुगांडा – युगांडा आणि रवांडामध्ये जळपास दोन कोटी लाक वापरतात.
  • लिंगाला – कांगो लोकतांत्रिक गणराज्य, कांगो गणराज्य, मध्य अफ्रीकी गणराज्य, अंगोला आणि दक्षिण सूडान गणराज्यमध्ये जवळपास 4.5 कोटी लोक वापरतात.
  • कुर्द – इराक जवळपास 8 लाख लोक वापरतात.
  • क्रियो – सिएरा लियोन जवळपास 40 लाख लोक वापरतात.
  • इलोकानो – उत्तर फिलीपींस मध्ये जवळपास 10 लाख लोक वापरतात.
  • गुआरानी – पराग्वे, बोलीविया, अर्जेंटीना आणि ब्राझीलमध्ये जवळपास 70 लाख लोक वापरतात.
  • ईवे – घाना आणि टोगोमध्ये जवळपास 70 लाख लोक वापरतात.
  • धिवेही – मालदीव तीन लाख लोक वापरतात.
  • बाम्बारा – मालीमध्ये 1.4 कोटी लोक वापरतात.
  • आयमारा – बोलीविया, चिली आणि पेरू