‘पदार्थायन’ देखण्या पुस्तकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा

कथक गुरू निवेदिता ताई रानडे यांच्या नुपूर नृत्यालयाच्या चमूने नितांत सुंदर नृत्याने या सोहळयाचा आरंभ झाला. प्रकाशक विवेक मेहेत्रे आणि लेखिका वृंदा दाभोलकरांच्या मनोगतानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा ज्येष्ठ लेखिका माधवी ताई घारपुरे यांनी वृंदाच्या आईच्या आठवणी सांगत पुस्तकामागचे प्रेरणास्थान दाखविले.

    मुंबई : ‘पदार्थायन’ हे वृंदा दाभोलकर लिखित उद्वेली प्रकाशनचे पुस्तक म्हणजे ५१ पदार्थांचे माहितीपूर्ण पण रसाळ असे आख्यान आहे. या पुस्तकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात २८ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ११ ते २ या वेळात पार पडला.

    कथक गुरू निवेदिता ताई रानडे यांच्या नुपूर नृत्यालयाच्या चमूने नितांत सुंदर नृत्याने या सोहळयाचा आरंभ झाला. प्रकाशक विवेक मेहेत्रे आणि लेखिका वृंदा दाभोलकरांच्या मनोगतानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा ज्येष्ठ लेखिका माधवी ताई घारपुरे यांनी वृंदाच्या आईच्या आठवणी सांगत पुस्तकामागचे प्रेरणास्थान दाखविले.

    त्यानंतर आपला सत्तरावा वाढदिवस साजरा करणाऱ्या चिरतरुण उद्योजक डॉ विठ्ठल कामत यांनी आपल्या खुमासदार शैलीत हे पुस्तक प्रत्येकाने का घ्यायलाच हवे, तसेच क्लाऊड किचन, व्यावसायिक तंत्र आणि मंत्र सांगितले. त्यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे.

    विशेष आकर्षण म्हणजे प्रकाशनासाठी पुस्तक ठेवण्याकरिता मिसळणाच्या लाकडी डब्यावर माधुरी घारपुरे यांनी उकडीच्या मोदकापासून ते डोसा, मासा अश्या विविध पाककृतीच्या सुंदर प्रतिकृती केल्या होत्या.

    यशश्री दाभोलकर हिने उपस्थितांचे आभार मानले. सौरभ सोहोनी यांनी उत्तम सूत्रसंचालन केले. हा कार्यक्रम पार पाडण्यात कौस्तुभ, पूर्वा, यशश्री यांची धावपळ आणि वृंदा यांचं नियोजन यांचा मोठा वाटा होता. वेध अकादमी चे मधुरा आणि संकेत ओक यांचीही यात मोलाची मदत झाली.