मेहता पब्लिकेशनचे संचालक सुनील मेहता यांचे अल्पशा आजाराने निधन

उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. प्रकाशन व्यवसायाला आधुनिक रुप देण्याऱ्या प्रकाशकांमध्ये त्यांचं नाव आघाडीने घेतलं जातं. आजच्या अनेक ख्यातनाम लेखकांना त्यांनीच आपल्या प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून ओळख मिळवून दिली.

  पुणे : मेहता पब्लिकेशनचे संचालक सुनील मेहता यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. किडनी स्टोनवरील उपचारासाठी त्यांना पूना हॉस्पीटल मध्ये दाखल केले होते. गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते पण उपचारादरम्यान त्यांचे एकेक अवयव फेल होत गेले. आज ४ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

  उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. प्रकाशन व्यवसायाला आधुनिक रुप देण्याऱ्या प्रकाशकांमध्ये त्यांचं नाव आघाडीने घेतलं जातं. आजच्या अनेक ख्यातनाम लेखकांना त्यांनीच आपल्या प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून ओळख मिळवून दिली.

  Koo App

  ’मेहता पब्लिशिंग हाऊस’ या अग्रगण्य प्रकाशन संस्थेचे संचालक सुनिल मेहता यांचे निधन झाले.अनेक लेखकांची दर्जेदार पुस्तके त्यांनी प्रकाशित केली आहेत.याशिवाय इतर भाषांतील अनेक पुस्तके मराठी भाषेत आणण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या निधनामुळे साहित्यक्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

  Supriya Sule (@supriya_sule) 12 Jan 2022

  १९७६ साली सुरु केलेल्या मेहता पाfब्लशिंग हाऊस सुरु झाले. सुनील मेहता यांनी १९८६ साली वडील अनिल मेहता यांच्याकडून व्यवसायाची सूत्रे हाती घेतली होती. त्यांनी अगदी लहान वयापासून मेहता पाfब्लशिंग हाऊसचा पाया आणि वाढ पाहिली आणि काम शिकून घेतले. तसेच वडिलांकडून व्यवसायाची दोरी आपल्या हाती घेतली. त्यांच्या नेतृlवाखाली कंपनीची ताकद वाढली आहे. मराठीत परदेशी आणि प्रादेशिक पुस्तकांचे भाषांतर आणि प्रकाशन केले. ई-बुक सेवाहि त्यांनी सुरू केली.