७३ व्या एमी अवॉर्ड्सचे लायन्सगेट प्लेवर आज थेट प्रक्षेपण

लायन्सगेट प्लेवर नेहमी सर्वोत्तम जागतिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोहळे आणि कार्यक्रम, शोची मेजवानी असते(There is a feast of international ceremonies and events, shows). ७३व्या एमी अवॉर्ड्स सोहळ्याने त्यात आणखी भर पडली आहे.

    मुंबई : ७३ व्या एमी पुरस्कार सोहळ्याचे थेट प्रक्षेपण (Live coverage of the 73rd Emmy Awards) सोमवारी (२० सप्टेंबर) सायं. ५.३० वा. लायन्सगेट प्लेवर (Lionsgate Play) केले जाणार आहे. लायन्सगेट प्ले हा स्टार्झ या ओटीटी प्लॅटफॉर्म सर्व्हिसचा (OTT Platform Services) जागतिक स्तरावरील प्रमुख कंटेट लीडर आहे.

    लायन्सगेट प्लेवर नेहमी सर्वोत्तम जागतिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोहळे आणि कार्यक्रम, शोची मेजवानी असते(There is a feast of international ceremonies and events, shows). ७३व्या एमी अवॉर्ड्स सोहळ्याने त्यात आणखी भर पडली आहे.

    ७३व्या एमी अवॉर्ड्स सोहळा हा सेड्रिकने (Cedric) आयोजित केला असून लॉस एंजलिस (अमेरिका) (Los Angeles (USA) या जगप्रसिद्ध शहरातून जगभरात प्रक्षेपित केला जाणार आहे. भारताचा विचार करता हा सोहळा लायन्सगेट प्लेवर हिंदी, मराठी, तमिळ, तेलुगु, कन्नड आणि भोजपुरी या सहा भाषांमध्ये प्रसारित केला जाईल.

    त्यासोबतच व्होडाफोन आयडिया, भारती एअरटेल, जिओ एफटीटीएच, ॲपल टीव्ही प्लस, ॲमेझॉन फायरस्टिक तसेच ओइएमच्या सहकार्याने जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवला जाणार आहे.