कुणाल खेमूचं प्रेक्षकांना सरप्राईज, तीन मित्रांची भन्नाट गोवा ट्रिप; धमाल कॅामेडीनं भरलेल्या ‘मडगाव एक्स्प्रेस’चा ट्रेलर रिलीज!

'मडगाव एक्स्प्रेस'चा ट्रेलर रिलीज झाला असून त्याला त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळात आहे. 'मडगाव एक्स्प्रेस'चे दिग्दर्शन कुणाल खेमूनं केलं असून कथाही त्यानेच लिहिली आहे. हा चित्रपट 22 मार्च रोजी रिलीज होणार आहे.

  अभिनेता कुणाल खेमू ( Kunal Kemmu) अभिनयातुन प्रेक्षकांवर प्रभाव पाडण्यात कमी पडला असला तरी सिनेसृष्टीत तो कायम अॅक्टव्ह असतो. आता कुणालनं प्रेक्षकांना एक अनोखं सरप्राईज दिलं आहे. कुणाल खेमूनं दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं असून त्याचा पहिल्या वहिल्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ‘मडगाव एक्स्प्रेस’ (Madgaon Express Trailer Out) असं चित्रपटाचं नाव असून त्याच्या ट्रेलरमध्ये गोव्याला जाण्यासाठी धडपडणाऱ्या तीन मित्रांची कथा दाखवण्यात आली आहे. मैत्री, कॅामेडी, रोमॅन्स असा फुल्ल पॅकेज आहे. दिव्येंदू शर्मा , प्रतीक गांधी आणि अविनाश तिवारी यांची मुख्य भूमिका असून हे तिघंही तुम्हाला हसवणार यात शंका नाही.

  काय आहे मडगाव एक्सप्रेस

  मडगाव एक्सप्रेस चित्रपट म्हणजे लहानपणापासून गोव्याला जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तीन मित्रांची कथा आहे. तिघांचेही हे स्वप्न सत्यात उतरतं. कसे तरी ते गोव्यात पोहोचतात. पण तिथे त्यांना नोरा फतेही आणि तिच्यासोबत छाया कदम आणि उपेंद्र लिमये भेटतात, जे त्यांचा प्रवास अधिक रोमांचक करतात. त्यांच्यापुढे अनेक अडचणीही येतात. या अडचणीतून हे तीन मित्र कसे बाहेर निघतात हे पाहणं मजेशीर आहे.

  युजर्संना आवडला ट्रेलर

  ‘मडगाव एक्स्प्रेस’चा ट्रेलर पाहून चाहत्यांच्या पंसतीस उतरला असून कुणाल खेमूच्या या चित्रपटाला सरप्राईज पॅकेज म्हणत आहेत. युझर्स कमेंट्समध्ये त्याचे भरभरून कौतुक करत आहेत. युट्यूबवर तीन तासांत याला ९.५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ‘म

  यूजर्स झाली ‘हेरा फेरी’ची आठवण

  युट्यूबवर तीन तासांत याला ९.५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. एका यूजरने लिहिले आहे, ‘व्वा, मजा आली, हे सरप्राईज आहे.’ दुसऱ्या यूजरची प्रतिक्रिया आहे की, ‘याचा सिक्वेल देखील असावा. कास्टिंग सुपर वर आहे. हा चित्रपट 22 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Kunal Kemmu (@kunalkemmu)