
अब तक छप्पन!....पण, तितकचं तेज आणि तितकाचं उत्साह....सौंदर्य असावं तर माधुरीसारखं... ५६ व्यावर्षी सुद्धा तितकीच सुंदर आणि तेजस्वी एका स्माईलवर तर सगळेच घायाळ....
हिंदी चित्रपटसृष्टीतील ऐंशीचा काळ गाजवला तो मराठमोळ्या माधुरी दीक्षितने
(happy birthday)आज वयाची ५६ वर्ष पूर्ण करत असताना….तिचे चित्रपट आठवणार नाहीत, असं कसं होईल ?या वाढदिवसाच्या निमित्ताने माधुरीच्या सौंदर्याची जादू आजही फॅशन डिझाईनर्सना भुरळ पाडत आहे. माधुरीचं सौंदर्य, तिचं हास्य आणि तिचं नृत्य कौशल्य याला तोड नाही. म्हणूनच आजही माधुरी दीक्षितचं प्रेक्षकांच्या मनातलं स्थान अबाधित आहे.
माधुरी जरी चित्रपटांपासून दूर असली तरी, ती डान्स शोमध्ये आपली छाप उमटवत आहे. इतकचं नाही तर, सोशल मीडियावरही माधुरीचा जलवा पहायला मिळतोयं. नियमित व्यायाम आणि योग्य आहारामुळे तिने आपलं सौंदर्य वयाच्या ५६ व्या वर्षीसुद्धा तेजस्वी ठेवलं आहे. माधुरीला मिळालेलं अभिनय आणि नृत्याचं वरदान हे तिच्या चाहत्यांसाठी मोठा ठेवा आहे. मराठमोळ्या लूक पासून ते अगदी वेस्टर्न लूकमध्येही ती हॉट दिसते.
माधुरीचा खरचं हेवा वाटतो. या वयातही तिने आपली क्रेझ कायम ठेवली आहे.
ऑफ शोल्डर सिक्वेन गाऊन आणि ट्रेंडी रेड वनपीस
या दोन्ही गाऊनमध्ये माधुरीचा जलवा अधिकच खुलून दिसतो. कमीत कमी ऍक्सेसरीज आणि ब्राईट कलर्स माधुरीच्या सौंदर्यात भर घालतयात. साधेपणा आणि तितकाच बोल्ड अंदाज….क्या बात है माधुरी !
शँपेन कलर गाऊन
माधुरीचा शँपेन कलर गाऊनमधला हॉट लूक