अभिनेते पुनीत इस्सार यांची ऑनलाइन फसवणूक, ईमेल हॅक करून १३ लाख हडपण्याचा प्रयत्न

पुनीत इस्सार यांचा एक कार्यक्रम मुंबईत आयोजित करण्यात आला होता. पण एका व्यक्तीने त्यांचा ईमेल हॅक करून या कार्यक्रमाच्या बुकिंगचे १३.७६ लाख रुपये हडपण्याचा प्रयत्न केला. पुनीत यांनी आपला ईमेल अॅक्सेस करण्याचा प्रय्तन केला असता हा प्रकार उजेडात आला.

    नवी दिल्ली – देशात ऑनलाईन फसवणुकीच्या घटना आता नित्याच्या झाल्या आहेत. अशीच एक घटना महाभारतात दुर्योधनाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेते पुनीत इस्सार यांच्यासोबत घडली आहे. पुतीन यांचे ईमेल अकाउंट हॅक करून एका व्यक्तीने तब्बल १३.७६ रुपयांची रकम हडप करण्याचा प्रयत्न केला आहे. यासंबंधी त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

    पुनीत इस्सार यांचा एक कार्यक्रम मुंबईत आयोजित करण्यात आला होता. पण एका व्यक्तीने त्यांचा ईमेल हॅक करून या कार्यक्रमाच्या बुकिंगचे १३.७६ लाख रुपये हडपण्याचा प्रयत्न केला. पुनीत यांनी आपला ईमेल अॅक्सेस करण्याचा प्रय्तन केला असता हा प्रकार उजेडात आला.

    पुनीत इस्सार यांनी आपल्या जय श्रीराम या हिंदा नाटकासाठी एनसीपीए थिएटर बुक केले होते. यासाठी त्यांना १३ लाख ७६ हजार ४०० रुपयांची रकम देण्यात आली होती. पुनीत हे नाटक १४-१५ जानेवारी २०२३ रोजी सादर करणार होते. त्यासाठी त्यांच्या थिएटर प्रोडक्शन कंपनीच्या मेल आयडीवरून बुकिंग करण्यात आले होते. पुनीत यांनी २२ नोव्हेंबर रोजी एनसीपीएला मेल करण्यासाठी आपला आपला मेल आयडी उघडण्याचा प्रयत्न केला. पण तो उघडलाच नाही. त्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांत धाव घेतली.

    या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. त्याला न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्याला २८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.