13 वर्षांपासून शारीरिक संबंध ठेवू दिले नाहीत’, महाभारतातील ‘कृष्णा’ नितिश भारद्वाज यांचा बायकोवर गंभीर आरोप!

'महाभारत' (Mahabharat) या लोकप्रिय मालिकेत कृष्णाची भूमिका साकारणाऱ्या नितीश भारद्वाज यांनी पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत. 13 वर्षांपासून शारीरिक संबंध ठेऊ दिले नाहीत, असं त्यांनी म्हटलं आहे.

  काही दिवसापुर्वी ‘महाभारत’ (Mahabharat) या लोकप्रिय मालिकेतून घराघरात भगवान कृष्ण म्हणून प्रसिद्ध असेलेले अभिनेते नितीश भारद्वाज (Nitish Bhardwaj) यांनी पत्नीपासून घटस्फोट घेत असल्याचं सांगितलं होतं. यानंतर ते अचानक चर्चेत आले. आता पुन्हा एकदा त्यांच नाव चर्चेतं आलं आहे. यापुर्वीच त्यांनी पत्नीवर गंभीर आरोप केले होते. आता पुन्हा त्यांनी पत्नीवर आरोप केले असून,’ स्मिताला फक्त पैसे उकळायचे होते आणि मी तिला मुलं जन्माला घालण्यासाठी हवा होतो’. गेल्या 13 वर्षांपासून तिने शारीरिक संबंध ठेऊ न दिल्याचा गंभीर आरोप नितीश भारद्वाज यांनी केला आहे.

  नितीश भारद्वाज यांचे आरोप काय

  निती भारद्वाज यांनी IAS पत्नी स्मिता घाटेविरोधात न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज केला आहे. घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान नितीश आणि स्मिताचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याचे सत्र सुरू आहे. त्यांनी यापुर्वी स्मिताविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी स्मितावर मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. स्मिता आपल्या जुळ्या मुलींना भेटूही देत नसल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. नुकत्याच एका मुलाखती दरम्यान तो म्हणाल की, ‘मी फक्त नावाचा पती आहे. गेल्या काही दिवसांपासून मला मानसिक त्रास होत आहे. माझ्या पत्नीला माझी गरज नाही. गेल्या 13 वर्षांपासून तिने शारीरिक संबंध ठेऊ दिले नाहीत, असं नितीश भारद्वाज म्हणाले आहेत.

  घर घेतल्यावर सुरू झाले वाद

  नितीश म्हणाले की,”2012 मध्ये आम्हाला जुळी मुलं झाली. प्रेग्नंट झाल्यानंतर स्मिताने पुण्यात एक घर विकत घेतलं होतं. इंडस्ट्रीतील लोकांना कर्ज मिळत नाही. त्यामुळे स्मिताच्या नावावर आम्ही घर घेतलं होतं. पण या घराचे पैसे मी दिले होते. तरी स्मिताने फक्त तिच्या एकटीच्या नावावर मला हे घर करायला लावलं.

  घर घेतल्यानंतर नितीश आणि स्मिताचे वाद व्हायला सुरुवात झाली. नितीश म्हणाले,”स्मिताचा स्वभाव खूप वेगळा होता. तिला पती-पत्नी हे रिलेशन नको होतं. पण तरी तिला लग्न का करायचं होतं हे मला कळलं नाही. आतापर्यंत तीन वेळा तिने लग्न केलं आहे. गेल्या 13 वर्षांपासून तिने शारीरिक संबंध ठेऊ दिले नाहीत. मी तिच्याजवळ गेल्यावर ती वेगळ्या खोलीत जायची. मुलं माझ्यासोबत येऊन झोपायची. शारीरिक संबंध ठेवण्यास ती नेहमीच नकार देत असे. पुढे मुलांना भेटण्यासही ती नकार देऊ लागली. व्हॉट्सअॅपवर तिने मला ब्लॉक केलं होतं आणि मी तिला ब्लॉक केलंय असं तिने मुलांना सांगितलं. मुलांसोबत तिने मला वेळ घालवू दिला नाही. स्मिताला फक्त माझे पैसे हवे होते. मी एटीएम कार्ड नाही तर एक व्यक्ती आहे. स्मितासारखे माझे मुलं होऊ नयेत, असं मला वाटतं.