शरद पवारांच्या ‘त्या’ ताफ्यावर अभिनेता सुमित राघवन संतापला म्हणाला…ट्विट होतय व्हायरल!

सुमित राघवन याने ट्वीट करून पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात घडलेल्या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

    पुण्यातील बालेवाडी परिसरात उभारल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठात अ‍ॅथेलिटिक ट्रॅकवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्या गाड्या उभा राहिल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. अभिनेता सुमित राघवनने देखील या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.

    सुमित राघवन याने ट्वीट करून पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात घडलेल्या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र हे एक खेदजनक राज्य आहे, कोरोनाचे नियम असतील, कायदा सुव्यवस्था असेल किंवा करदाते असतील, यांचा अजिबात आदर राखला जात नाही, अशी नाराजी राघवन याने व्यक्त केली. नवी मुंबईतील विमानतळासाठी नामकरणावर मोर्चे काढले जात आहे. दहीसर टोलनाक्यावर आंदोलन केले जात आहे. आणि आता खेळाडूंच्या ट्रॅकवर नेत्यांच्या गाड्या उभ्या राहत आहे, असंही राघवन म्हणाला.

    काय आहे प्रकरण

    बालेवाडी परिसरात उभारल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार आणि राज्यमंत्री अदिती तटकरे हे शिवछत्रपती क्रीडा संकुलातदाखल झाले होते. तेव्हा त्यांच्या गाड्यांचा ताफा चक्क मुख्य अ‍ॅथलेटिक्स स्टेडियमच्या ट्रॅकवर उभा करण्यात आल्या होत्या.

    सुमारे ५ कोटी रुपये खर्च करून हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिंथेटिक ट्रॅक उभारला गेला आहे. खेळाडूंच्या सरावा व्यतिरिक्त इथं पायी चालण्याचीही परवानगी नसते. हे माहीत असून देखील, आलेल्या मंत्र्यांचे दोन मजले चढण्याच श्रम वाचावं आणि आपल्याला शाबासकी मिळावी यासाठी क्रीडा अधिकाऱ्यांनी केल्या या करामतीमुळे क्रीडा विभागाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला.